Advertisement

स्वप्नील-मुक्ताच्या ‘मुंबई पुणे मुंबई-३’ला ७ डिसेंबरचा मुहूर्त

स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे या हिट जोडीचा ‘मुंबई पुणे मुंबई’चा तिसरा भाग ७ डिसेंबर २०१८ रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे निर्माते संजय छाब्रिया, सह-निर्माते अमित भानुशाली (फ्रायडे सिनेमाज) आणि दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी ‘मुंबई पुणे मुंबई-३’ चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा केली आहे.

स्वप्नील-मुक्ताच्या ‘मुंबई पुणे मुंबई-३’ला ७ डिसेंबरचा मुहूर्त
SHARES

‘मुंबई पुणे मुंबई-१’ हा चित्रपट बरोबर आठ वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. त्यावेळी तो राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खूप गाजला. या चित्रपटाचा पुढचा भाग ‘मुंबई पुणे मुंबई-२’ दोन वर्षांपूर्वी आला आणि त्यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती झाली. आताही ही यशोगाथा पुन्हा लिहिली जाणार आहे. स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे या हिट जोडीचा ‘मुंबई पुणे मुंबई’चा तिसरा भाग ७ डिसेंबर २०१८ रोजी प्रदर्शित होणार आहे.


अमेरिकेतही उत्स्फूर्त प्रतिसाद

चित्रपटाचे निर्माते संजय छाब्रिया, सह-निर्माते अमित भानुशाली (फ्रायडे सिनेमाज) आणि दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी ‘मुंबई पुणे मुंबई-३’ चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा केली आहे. ‘मुंबई पुणे मुंबई-२’ हा दोन वर्षांपूर्वी दिवाळीमध्ये प्रदर्शित झाला होता. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर गोवा, गुजरात, कर्नाटक आणि अगदी अमेरिका, युनायटेड किंगडम, ऑस्ट्रेलिया आणि इतर देशांमधील चित्रपट रसिकांनीही या चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता.

‘मुंबई पुणे मुंबई’ला एवढं यश मिळेल असं सुरुवातीला वाटलंच नव्हतं. ‘मुंबई पुणे मुंबई’ हा आता एक वेगळा ट्रेंड झाला असून, प्रेमकथेचा एक वेगळा बाज त्यातून गिरवला गेला आहे. लोकांना गौतम आणि गौरी यांच्या आयुष्यात काय घडतं आहे, त्याबद्दल जिज्ञासा असते.
- सतीश राजवाडे, दिग्दर्शक

स्वप्नील-मुक्ता ही जोडी रसिकांना खूपच भावते. त्यामुळेच ‘मुंबई पुणे मुंबई’च्या दोन्ही भागांना सिनेरसिकांकडून फार मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभला होता. ही बाब बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने केलेल्या व्यवसायातूनही स्पष्ट होतं.


हेही वाचा -

साऊथचा तडका असलेल्या मराठमोळ्या गाण्यावर थिरकणार संग्राम-मयूरी

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा