Advertisement

'रेडू'चा गमतीदार ट्रेलर लाँच


'रेडू'चा गमतीदार ट्रेलर लाँच
SHARES

मालवणी भाषेचा तडका आणि रेडियोची धमाल घेऊन येणाऱ्या 'रेडू' सिनेमाचा गमतीदार ट्रेलर नुकताच सोशल नेटवर्किंग साईटवर लाँच करण्यात आला. ६०-७० च्या दशकातला 'रेट्रो' काळ गाजवणाऱ्या रेडियोची रंजक सफर या ट्रेलरमधून घडून येत असल्यामुळे, हा सिनेमा अनेकांसाठी नाॅस्टेलजिक ठरणार आहे.


कधी प्रदर्शित होणार?

'रेडू' हा सिनेमा, येत्या १८ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. सागर छाया वंजारी दिग्दर्शित आणि संकलित 'रेडू' या सिनेमात मराठी आणि मालवणी भाषेची सरमिसळ आहे. रेडूच्या माध्यमातून सामान्य माणसाचं भावविश्व या सिनेमात मांडण्यात आलं आहे.


या ट्रेलरमध्ये काय?

रेडूवर अमाप प्रेम करणाऱ्या प्रमुख पात्राची भूमिका यात शशांक शेंडे यांनी वठवली असून, त्यांच्या विनोदी अभिनयाची अनोखी झलकदेखील या सिनेमाच्या ट्रेलरमधून आपल्याला पाहायला मिळते. जिवापाड जपलेला हा रेडू जेव्हा हरवतो, तेव्हा काय होतं? अखेर तो सापडतो का? हे सारं काही या सिनेमात पाहायला मिळणार आहे.

source - yottube LandmarcFilms
 
'रेडू' विषयी ग्रामस्थांमध्ये असणारे कुतूहल आणि त्यामुळे उद्भवणारे गमतीदार प्रसंग यात दिसून येत असल्यामुळे, हा सिनेमा प्रेक्षकांचे भरघोस मनोरंजन करणार आहे.

शशांक शेंडे बरोबरच छाया कदम ही ताकदीची अभिनेत्री या सिनेमात पाहायला मिळणार आहे. कोकणच्या मातीचा सुगंध आणि रेडूचा नाद लावणारा हा सिनेमा प्रेक्षकांना मे महिन्याच्या गर्मीत विनोदाचा थंडावा घेऊन येणार हे निश्चित!


हेही वाचा - 

तुम्हाला माहितीये का 'रेडू'चा अर्थ?

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा