Advertisement

तुम्हाला माहितीये का 'रेडू'चा अर्थ?

'रेडू'च्या अर्थाचे अनेक तर्कवितर्क मराठीतील काही कलाकरांनीदेखील लावायला सुरुवात केली आहे. ज्यात प्रिया बापटच्या मते रेडू म्हणजे रेड्याचे पिल्लू आहे, तर सारंग साठ्येने रेडूचा 'रेडू स्टेडू गो' असा मजेशीर अर्थ सांगितला. रसिका सुनील 'रेडू' एका प्राण्याचे नाव असेल असा अंदाज व्यक्त करते, तर भाऊ कदमने रेडूला 'रेडा' म्हटले आहे.

तुम्हाला माहितीये का 'रेडू'चा अर्थ?
SHARES

'रेडू' असे गंमतीशीर नाव असलेला एक मराठी सिनेमा लवकरच येत आहे. मात्र, या 'रेडू'चा नेमका अर्थ काय? रेड्याला रेडू म्हटले असेल का? किंवा आणखीन काही? असे अनेक प्रश्न लोकांना या हटके नावामुळे पडत आहेत.

'रेडू' या सिनेमातील टीझर पोस्टरवर रेडियोचा चेहरा असलेला एक माणूस चालताना दिसून येतोय. जुन्या काळातला आकाशवाणी संच यात पाहायला मिळत असल्यामुळे, एका रेडियोची गंमतीदार गोष्ट पाहायला मिळणार असल्याचा अंदाज हा टीझर पोस्टर पाहताना येतो. शिवाय यात मालवणी भाषादेखील आपल्याला ऐकू येत असल्यामुळे, रेडियोच्या माध्यमातून मालवणी मनोरंजाचा तडकादेखील यात प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.



काय घेतला कलाकारांनी रेडूचा अर्थ?

'रेडू'च्या अर्थाचे अनेक तर्कवितर्क मराठीतील काही कलाकरांनीदेखील लावायला सुरुवात केली आहे. ज्यात प्रिया बापटच्या मते रेडू म्हणजे रेड्याचे पिल्लू आहे, तर सारंग साठ्येने रेडूचा 'रेडू स्टेडू गो' असा मजेशीर अर्थ सांगितला. रसिका सुनील 'रेडू' एका प्राण्याचे नाव असेल असा अंदाज व्यक्त करते, तर भाऊ कदमने रेडूला 'रेडा' म्हटले आहे. इतकेच नव्हे, तर अमेय वाघने थेट 'रेडीमेड' आणि 'ड्युप्लेक्स'ला एकत्र करत 'रेडू' असा निष्कर्ष काढला. खरं तर यापैकी कोणालाच 'रेडू'चा नेमका अर्थ सांगता आलेला नाही. 'रेडू' नावाविषयी कलाकारांनी केलेल्या या भन्नाट तर्कवितर्कानंतर, अखेरीस 'रेडू'चा खरा अर्थ या सिनेमाच्या टीझर पोस्टरद्वारे स्पष्ट करण्यात आला आहे.



रेडिओच्या अमाप प्रेमाची गोष्ट सांगणाऱ्या या विनोदी सिनेमात शशांक शेंडे मध्यवर्ती भूमिकेद्वारे प्रेक्षकांसमोर येणार आहेत. छाया कदम यांची देखील यात प्रमुख भूमिका आहे. मालवणी भाषेचा साज असलेल्या या सिनेमाचे चित्रीकरण कोकणात झाले आहे. त्यामुळे, नोकरदार वर्गासाठी यंदाची उन्हाळी सुट्टी मनोरंजनाची पर्वणीच घेऊन आली आहे. कारण फणस, जांभूळ आणि हापूस आंब्याची लज्जत चाखण्याबरोबरच, कोकणी संस्कृतीच्या खुमासदार विनोदाची मेजवानीदेखील 'रेडू'च्या निमित्ताने प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे!





हेही वाचा

‘Once मोअर’ चित्रपटाचं मोशन पोस्टर रिलीज

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा