‘Once मोअर’ चित्रपटाचं मोशन पोस्टर रिलीज


  • ‘Once मोअर’ चित्रपटाचं मोशन पोस्टर रिलीज
SHARE

एखादी गोष्ट आपल्याला आवडली की आपण त्याला दाद देण्यासाठी वन्स मोअर असं म्हणतो. हीच संधी आता प्रेक्षकांना पुन्हा एकदा मिळणार आहे. प्रेक्षकांचा कल कायमच वेगळ्या विषयावर आधारीत चित्रपट बघण्याकडे असतो. अगदी अशाच नेगळ्या विषयावर आधारीत ‘Once मोअर’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर या चित्रपटाचंं मोशन पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलं आहं. या चित्रपटाच्या निमित्ताने शेफ विष्णू मनोहर निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहेत.

‘Once मोअर’ या चित्रपटाच्या मोशन पोस्टरमध्ये एका व्यक्तीचा शोध दिसून येत आहे. या शोध घेणाऱ्या व्यक्तिरेखेमुळे या चित्रपटात नक्की काय असावं याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. 'चित्रपटाचे मोशन पोस्टर पाहिल्यानंतर या चित्रपटात ‘कुछ हटके’ आहे असं वाटत आहे. हा शोध नेमका कशाचा आहे? शोध घेणारी ती व्यक्ती कोण? या सगळ्या गोष्टी अद्याप गुलदस्त्यात आहेत. या चित्रपटातून कोणता विषय हाताळण्यात येईल? या सगळ्या गोष्टींवरून लवकरच पडदा उठणार आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या

‘Once मोअर’ चित्रपटाचं मोशन पोस्टर रिलीज
00:00
00:00