Advertisement

प्रिया-उमेशची गोड बातमी काय?


प्रिया-उमेशची गोड बातमी काय?
SHARES

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रेक्षकांच्या आवडत्या काही रिअल लाईफ जोड्यांपैकी एक असलेल्या प्रिया बापट आणि उमेश कामत यांनी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याकडे एका गोड बातमी असल्याचं जाहीर केलं आहे.


काय आहे ही गोड बातमी?

चंदेरी दुनियेतील कलाकारांचं लग्न झालं की, त्यांच्या चाहत्यांसह सर्वांनाच वेध लागतात ते त्यांच्या घरी येणाऱ्या नवीन पाहुण्याचे. त्यांच्या आयुष्यातील हा नवीन पाहुणा कधी येणार हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच असते. प्रिया-उमेशच्या बाबतीतही असंच काहीसं घडलं आहे. मागील बऱ्याच दिवसांपासून त्यांचे चाहते ज्याची वाट पाहात आहेत त्याची जणू घोषणाच आज प्रियाने आपल्या फेसबुक अकाऊंटच्या माध्यमातून केली आहे, की काय ते समजत नाही.
रोमँटिक फोटो केला शेअर

प्रिया आणि उमेश नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संवाद साधत आपल्या वर्तमान स्थितीबाबत अपडेट देत असतात. केवळ कामासंदर्भातील फोटो, बातम्या किंवा व्हिडिओ शेअर न करता आपल्या खासगी जीवनातील गोष्टीही दोघे सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवत असतात. आपल्याकडे गोड बातमी असल्याचं प्रियाने 'एक गुड न्यूज आहे' असं म्हणत आणि उमेशसोबतचा आपला रोमँटिक फोटो शेअर करत सांगितलं आहे.


चार वर्षांनी येणार एकत्र

सोशल मीडियाचा योग्य वापर करून आपली सुख-दु:ख चाहत्यांसोबत शेअर करणाऱ्या प्रिया-उमेशवर गोड बातमीच्या पोस्टमुळे चहूबाजूंनी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. प्रिया-उमेशच्या जीवनात नवीन पाहुणा येणार असल्याची चर्चा या पोस्टमुळे सुरू झाली आहे. ही पोस्ट नेमकी कोणत्या आशयाने टाकण्यात आली आहे, ते स्पष्ट करण्यात न आल्याने चाहत्यांसोबतच चित्रपटसृष्टीमध्येही काहीसं संभ्रमाचं वातावरण आहे. कारण प्रिया आणि उमेश लवकरच एका चित्रपटातही एकत्र येणार आहेत. जवळजवळ चार वर्षांनी एकत्र येणाऱ्या या रिल लाईफ जोडीच्या चित्रपटाची कथा आणि शीर्षक अद्याप गुलदस्त्यात आहे.

संबंधित विषय
Advertisement