Advertisement

सलीम-सुलेमानचा मराठी चित्रपटसृष्टीतील ‘प्रवास’ सुरू

सलीम-सुलेमान ही जोडी प्रथमच एका मराठी चित्रपटाला संगीत देत आहे. ‘प्रवास’ असं शीर्षक असलेल्या चित्रपटाच्या माध्यमातून या जोडीचा मराठी चित्रपटसृष्टीतील ‘प्रवास’ खऱ्या अर्थाने सुरू झाला आहे. या चित्रपटातील एक गाणं सलीम-सुलेमान यांनी नुकतंच संगीतबद्ध केलं आहे.

सलीम-सुलेमानचा मराठी चित्रपटसृष्टीतील ‘प्रवास’ सुरू
SHARES

पूर्वीच्या काळापासूनच हिंदी सिनेसृष्टीत बऱ्याच संगीतकारांनी जोड्यांच्या रूपात आपला ठसा उमटवण्यात यश मिळवलं आहे. आजची पिढीही याला अपवाद नाही. सलीम-सुलेमान या संगीतकार दुकलीनेही अनोख्या संगीतशैलीच्या बळावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता या जोडीने मराठीची वाट धरली आहे.


सलीम-सुलेमानचा 'प्रवास'

‘लक’, ‘लेडीज वर्सेस रिकी बहल’, ‘बँड बाजा बरात’, ‘हिरोइन’, ‘सत्याग्रह’, ‘जय गंगाजल’ अशा बहुचर्चित चित्रपटांना यशस्वी संगीत देणारी सलीम-सुलेमान ही जोडी प्रथमच एका मराठी चित्रपटाला संगीत देत आहे. ‘प्रवास’ असं शीर्षक असलेल्या चित्रपटाच्या माध्यमातून या जोडीचा मराठी चित्रपटसृष्टीतील ‘प्रवास’ खऱ्या अर्थाने सुरू झाला आहे. या चित्रपटातील एक गाणं सलीम-सुलेमान यांनी नुकतंच संगीतबद्ध केलं आहे.


'संगीत देताना आनंद'

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या जीवनावर आधारित असलेल्या ‘अण्णा’ या हिंदी चित्रपटाचं दिग्दर्शन करणारा अभिनेता-दिग्दर्शक शशांक उदापूरकर ‘प्रवास’चं दिग्दर्शन करत आहे. सलीम-सुलेमान यांनी संगीतबद्ध केलेलं ‘प्रवास’मधील गाणं गुरू ठाकूरने लिहिलं असून, सोनू निगमने गायलं आहे. मराठी चित्रपटासाठी प्रथमच संगीत देताना आनंद होत असल्याची भावना सलीम-सुलेमान यांनी व्यक्त केली आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा