Advertisement

सायली-शिवानी बनल्या सलमानच्या नायिका!

सलमान म्हटलं की लगेच बॅालिवुड स्टार सलमान खानची आठवण होते. सायली संजीव आणि शिवानी सुर्वेही सलमानच्या नायिका बनल्या आहेत खऱ्या, पण हा तो सलमान नसून 'सातारचा सलमान' आहे.

सायली-शिवानी बनल्या सलमानच्या नायिका!
SHARES

सलमान म्हटलं की लगेच बॅालिवुड स्टार सलमान खानची आठवण होते. सायली संजीव आणि शिवानी सुर्वेही सलमानच्या नायिका बनल्या आहेत खऱ्या, पण हा तो सलमान नसून 'सातारचा सलमान' आहे.


सातारचा सलमान

बिग बॅासमध्ये आपल्या तल्लख बुद्धीचा खेळ दाखवणारी शिवानी सुर्वे पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे ती आपल्या आगामी चित्रपटामुळं. त्यासोबतच 'काहे दिया परदेस' फेम सायली संजीवही सध्या भलतीच लाईमलाईटमध्ये आहे. या दोघींना चक्क सलमानच्या नायिका बनण्याची संधी मिळाली आहे. हे जरी खरं असलं तरी हा बॅालीवुड स्टार सलमान खान नव्हे, तर 'सातारचा सलमान' या आगामी मराठी चित्रपटाचा नायक आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं सायली आणि शिवानी प्रथमच सिनेमात एकत्र झळकणार आहेत.


टिझर प्रदर्शित

'स्वप्नं बघितली तरच खरी होतात' अशी टॅगलाईन असलेल्या 'सातारचा सलमान'या चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. सुयोग गोऱ्हेची झलक यात पाहायला मिळाली. या टिझरला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत असतानाच उत्सुकता होती, ती 'सातारचा सलमान'ची हिरोईन कोण? असणार याची. मात्र हे गुपित अखेर उलगडलं असून, यात सायली संजीव आणि शिवानी सुर्वे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. नुकतंच या दोघींचं कॅरेक्टर पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलं आहे. 


११ ऑक्टोबरला प्रदर्शित

पोस्टरवरील सायलीचा लूक पाहता ती 'माधुरी माने' या निरागस, सोज्वळ मुलीची भूमिका साकारत असून, शिवानी 'दिपिका भोसले' या बोल्ड, बिनधास्त मुलीची भूमिका साकारत असल्याचं समजतं. असं असलं तरी  सुयोगची नायिका नेमकी कोण आहे? म्हणजे दोघीही का कोणीतरी एक? हा संभ्रम निर्माण होतोच. हे प्रकरण नेमकं काय आहे ते सिनेमा पाहिल्यावरच समजेल. टेक्सास स्टुडियोजचे प्रकाश सिंघी निर्मित या चित्रपटाचं दिग्दर्शन आणि लेखन हेमंत ढोमेनं केलं आहे. ११ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.हेही वाचा  -

राशीचं भविष्य मांडणार 'आलंय माझ्या राशीला'
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा