Advertisement

राशीचं भविष्य मांडणार 'आलंय माझ्या राशीला'

रास ही प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावत असते. भविष्य आणि ज्योतिष न मानणाऱ्यांनीही जरी हे किती नाकारलं तरी हे सत्य असल्याचं सांगणारा 'आलंय माझ्या राशीला' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

राशीचं भविष्य मांडणार 'आलंय माझ्या राशीला'
SHARES

रास ही प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावत असते. भविष्य आणि ज्योतिष न मानणाऱ्यांनीही जरी हे किती नाकारलं तरी हे सत्य असल्याचं सांगणारा 'आलंय माझ्या राशीला' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


आनंद पिंपळकर सिनेनिर्मितीकडे

आजवर वास्तुशास्त्राच्या माध्यमातून अनेकांना मार्गदर्शन करणारे 'आनंदी वास्तू' फेम वास्तुविशारद आनंद पिंपळकर आता सिनेनिर्मितीकडे वळले आहेत. त्यांची पहिली मराठमोळी निर्मिती असलेल्या 'आलंय माझ्या राशीला' या आगामी मराठी सिनेमाचा मुहूर्त दादर येथील प्लाझा सिनेमागृहात एका छोटेखानी सोहळ्यात करण्यात आला. या चित्रपटाचं दिग्दर्शन अजित शिरोळे करणार आहेत. या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या निर्मिती सावंत मुहूर्ताच्या सोहळ्याला उपस्थित होत्या. शिरोळे यांनी लाईट्स, कॅमेरा, अॅक्शन म्हणताच निर्मिती सावंत यांनी क्लॅप देत 'आलंय माझ्या राशाीला' या चित्रपटाचा मुहूर्त केला.


राशींच्या गमतीशीर कथा 

डझनभर चित्रपटांचं दिग्दर्शन केलेल्या अजित शिरोळे यांचा 'आलंय माझ्या राशीला' हा तेरावा सिनेमा आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून ते १२ राशींच्या व्यक्तींच्या स्वभावांचं दर्शन घडवणार आहेत. या बारा राशींसाठी मराठी सिनेसृष्टीतील १२ कलाकार विविध स्वभावाच्या व्यक्तिरेखा सादर करणार आहेत. यात निर्मिती सावंत, मकरंद अनासपुरे, चिन्मय मांडलेकर, प्रशांत दामले, प्रसाद ओक आदी मराठीतील आघाडीच्या कलाकारांचा समावेष आहे. राशींच्या गुणधर्मानुसार व्यक्तीचा स्वभाव असतो, अशी ज्योतिषशास्त्रात मान्यता आहे. या राशींच्या वैशिष्ट्यातून अनेक गमतीजमती घडत असतात. अशाच बारा राशींच्या गमतीशीर कथा 'आलंय माझ्या राशीला' या चित्रपटात पहायला मिळणार आहे. साईकमल प्रोडक्शनची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाच्या अश्विनी आनंद पिंपळकर निर्मात्या असून, सहनिर्माते दिलीप जाधव आहेत.


चित्रीकरणास लवकरच प्रारंभ 

या चित्रपटाचं लेखन हेमंत एदलाबादकर यांचं आहे. कलादिग्दर्शन वासू पाटील आणि सचिन पाटील, तर नृत्यदिग्दर्शन नरेंद्र पंडित यांचं आहे. गीतं गुरु ठाकूर आणि अभय इनामदार यांची असून, संगीत चैतन्य अडकर यांचं आहे. अजय गोगावले, आदर्श शिंदे यांनी यातील गाणी स्वरबद्ध केली आहेत. संकलन विजय खोचीकर तर छायाचित्रण कृष्णा सोरेन करणार आहेत. कॉश्च्युम डिझायनर मैत्रिय शेखर व मेकअप सोनू निकम यांचं आहे. साहसदृश्य अकबर शरीफ यांची आहेत. कार्यकारी निर्माते अमित माझिरे आहेत. चित्रपटाच्या चित्रीकरणास लवकरच प्रारंभ होणार आहे.



हेही वाचा  -

सुबोधनं आणला भरतरूपी बाप्पा

'कॉपी' चित्रपटाचं मोशन पोस्टर पाहिलं का?




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा