Advertisement

सुबोधनं आणला भरतरूपी बाप्पा

सध्या सगळीकडं गणेशोत्सवाचं वातावरण असून, काही कलाकारांच्या घरीही गणपती बाप्पा विराजमान झाल्याचं आपण पाहिलं. अभिनेता सुबोध भावेनं मात्र भरत जाधवरूपी बाप्पा घरी आणला आहे.

सुबोधनं आणला भरतरूपी बाप्पा
SHARES

सध्या सगळीकडं गणेशोत्सवाचं वातावरण असून, काही कलाकारांच्या घरीही गणपती बाप्पा विराजमान झाल्याचं आपण पाहिलं. अभिनेता सुबोध भावेनं मात्र भरत जाधवरूपी बाप्पा घरी आणला आहे.

लाडका अभिनेता

आज घरोघरी गणपती बाप्पांची मनोभावे पूजा केली जात आहे. मराठमोळे कलाकारही यात मागे नाहीत. काहींनी दीड दिवसांच्या, तर काहींनी गौरी-गणपतीची सेवा करून यशस्वी विसर्जनही केलं आहे. काहींच्या घरी मात्र अनंत चतुर्दशीपर्यंत बाप्पा विराजमान असून, भक्तांचा पाहुणचार घेत आहेत. अशातच अभिनेता सुबोध भावेनं मात्र एका अशा बाप्पाला डोक्यावर घेतल्याचं पहायला मिळत आहे, ज्यानं आजवर महाराष्ट्रातील तमाम रसिकांना आपल्या अभिनयानं खळखळून हसवलं आहे. हा बाप्पा दुसरा तिसरा कोणी नसून, मराठी प्रेक्षकांचा लाडका अभिनेता भरत जाधव आहे.

पोस्टर रिलीज

हे कोणालाही सांगून खरं वाटणार नसल्यानंच कदाचित सुबोध आणि भरत यांच्या भूमिका असलेल्या आगामी मराठी चित्रपटाचं पोस्टर नुकतंच रिलीज करण्यात आलं आहे. 'आप्पा आणि बाप्पा' असं शीर्षक असलेल्या या चित्रपटात सुबोध आणि भरत यांच्या मुख्य भूमिका आहेत. रिलीज करण्यात आलेल्या सिनेमाच्या पोस्टरवर सुबोधनं पाटावर बसलेल्या भरतला चक्क डोक्यावर उचलून घेतल्याचं पहायला मिळतं. आपल्या घरी बाप्पा येणार असल्यानं आप्पाच्या भूमिकेतील सुबोध आनंदी आहे, तर त्याच्या डोक्यावर गणपती बाप्पाच्या मुद्रेमध्ये भरतही रसिकांना आशीर्वाद देताना दिसत आहे.

भगवा वेष धारण 

भरतनं साकारलेला हा बाप्पा खूपच साधा दिसत आहे. अगदी सर्वसामान्य माणसाप्रमाणं त्याचे कपडेही खूप साधे आहेत. त्यानं शर्ट-पँट परिधान केला असला तरी, ज्या भक्ताच्या घरी तो विराजमान होणार आहे त्यानं म्हणजेच सुबोधनं भगवा वेष धारण केलेला आहे. कपाळावर टिळा, गळयात रूद्राक्षांच्या माळा, भगवा सदरा आणि उपरणं असा सुबोधचा वेष या पोस्टरमध्ये पहायला मिळतो. ११ आॅक्टोबरला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाची निर्मिती गरीमा धीर, जलज धीर यांनी केली आहे. अश्वनी धीर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून, अरविंद जगताप यांच्यासोबत लेखनही केलं आहे. सूर्या मिश्रा यांनी छायांकन केलं आहे, तर संगीत सारंग कुलकर्णी, सायली खरे, अभंग रिपोस्ट यांनी दिलं आहे.हेही वाचा -

रमाबाईंच्या भूमिकेनं अभिनेत्री म्हणून श्रीमंत केलं - शिवानी रांगोळे

नऊ कलाकार आणि सहा लोककलांनी सजलेलं 'हिरकणी'तील शिवराज्याभिषेक गीत
संबंधित विषय
Advertisement