Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
53,44,063
Recovered:
47,67,053
Deaths:
80,512
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
36,674
1,447
Maharashtra
4,94,032
34,848

'वेडिंगचा शिनेमा'नं दिले ऑनलाइन गायक


'वेडिंगचा शिनेमा'नं दिले ऑनलाइन गायक
SHARES

मराठी सिनेसृष्टीनं नेहमीच नवनवीन गायकांना जन्म दिला आहे. मराठी सिनेसृष्टीच्या पटलावर उदयाला आलेल्या या गायकांनी मग भारतीय सिनेसृष्टीतही आपला ठसा उमटवला आहे. आता ‘वेडिंगचा शिनेमा’ या सिनेमाद्वारे दोन नवीन गायक रसिकांच्या भेटीला येणार आहेत.


ऑनलाइन ऑडिशन

मराठी चित्रपटांमध्ये अनेकानेक प्रयोग गेल्या काही वर्षांमध्ये होत आले आहेत. संगीत दिग्दर्शक डॉ सलील कुलकर्णी यांच्या ‘वेडिंगचा शिनेमा’च्या टीमनं केलेला हा प्रयोग याआधी कुठेही झालेला नाही. या चित्रपटातील एक गाणं चक्क ऑनलाइन ऑडिशनच्या माध्यमातून गायकांची निवड करून ध्वनिमुद्रित केलं जात आहे. देश-विदेशातील गायकांकडून मिळालेल्या प्रतीसादानंतर तब्बल ४१२ गायकांमधून दोघांची निवड करण्यात आली आहे. या गाण्याचं ध्वनीमुद्रण लवकरच केलं जाणार आहे. माजलगावचा सौरभ शिरसाठ आणि कोल्हापूरची स्वरूपा बर्वे यांची निवड या गाण्यासाठी केली गेली आहे.


होतकरू गायकांचे व्हीडिओ  

“कुनीबी कसंबी घालुदे पिंगा...” असे बोल असलेलं हे गाणं हे गायक गाणार आहेत. मागच्या आठवड्यात सलील कुलकर्णी यांनी हे बोल फेसबुकच्या माध्यमातून ऑनलाइन टाकले आणि गाण्याचे व्हीडीओ अपलोड करण्याचं आवाहन नवोदित गायकांना केलं होतं. याला भारतासोबतच ओमान, बाहरीन, अमेरिका, कॅनडा आदी देशांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्याचबरोबर गोवा, गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश या राज्यांमधून आणि महाराष्ट्राच्या विविध भागांतून सर्व वयोगटातील होतकरू गायकांनी आपले व्हीडीओ अपलोड केले होते. 


स्वरूपा, सौरभची निवड

पुणे आणि त्याखालोखाल मुंबईतील गायकांनी या आवाहनाला सर्वाधिक प्रतिसाद दिला. या स्पर्धेचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. यात स्वरूपा व सौरभ यांची निवड करत असल्याची घोषणा करण्यात आली. १२ एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटातील तीन गाणी याआधीच प्रकाशित करण्यात आली आहेत. ध्वनीमुद्रित होणारं या सिनेमातील हे चौथं गाणं आहे.


अनोखा प्रयोग

या अनोख्या प्रयोगागाबद्दल डॉ. सलील कुलकर्णी म्हणाले की, हे गाणं ऑडीशनच्या माध्यमातून गावून घेण्याचं ठरल्यावर संदीप खरेनंही ते त्याचप्रकारे लिहिलं. गेल्या आठवड्यात फेसबुकच्या माध्यमातून मी आवाहन केल्यानंतर १३ ते १६ मार्च या चार दिवसांमध्ये या आवाहनाला भरभरून प्रतिसाद लाभला. आज आम्ही त्यातील विजेत्यांची घोषणा केली. मला खूप आनंद होतोय की माजलगावचा सौरभ आणि कोल्हापूरची स्वरूपा हे धमाल गाणं गाणार आहेत.


टीझर, गाणी प्रदर्शित

सलिल यांचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट आहे. पारंपारिक रीतीरिवाज ते आधुनिक फॅड आणि पद्धती यांचा मिलाप हल्ली भारतीय विवाह सोहळ्यांमध्ये पाहायला मिळतो आणि तो संपूर्ण कुटुंबासाठी उत्सवी क्षणांचा मेळावा ठरतो. ‘वेडिंगचा शिनेमा’मध्ये हे सर्व पैलू मनोरंजनाच्या मसाल्यांसह प्रेक्षकांसमोर येणार आहेत. या चित्रपटाचा एक टीझर आणि दोन गाणी नुकतीच प्रदर्शित झाली होती. शिवाजी साटम, अलका कुबल, मुक्ता बर्वे, सुनील बर्वे, अश्विनी काळसेकर या आघाडीच्या कलाकारांबरोबरच भाऊ कदम, प्रवीण तरडे हे कलाकारसुद्धा या चित्रपटात आहेत.हेही वाचा -

'हा' आहे ऋतिकचा अनोखा फंडा

सईचं 'सही' फोटोसेशन पाहिलं का?संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा