Advertisement

जिया वाडकरचं वडिलांच्या पावलावर पाऊल, पार्श्वगायिका म्हणून केलं पदापर्ण!


जिया वाडकरचं वडिलांच्या पावलावर पाऊल, पार्श्वगायिका म्हणून केलं पदापर्ण!
SHARES

ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांची कन्या जिया वाडकर ही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत पार्श्वगायन क्षेत्रात पदार्पण करत आहे. योगायतन फिल्म्सची निर्मिती असलेल्या ‘परी हूँ मैं’ या आगामी मराठी चित्रपटासाठी जियानं गाणं गायलं आहे. या चित्रपटातील ‘मोठ्या मोठ्या लाटांवरी आता तरी पोहू दे’, ‘चमचमणारी स्वप्न सारी आता खरी होऊ दे’ हे टायटल साँग जियासोबत मंदार पिळवलकरच्या आवाजात नुकतंच रेकॉर्ड करण्यात आलं.



काय आहे या चित्रपटात?

वडील मुलीचं नातं अधोरेखित करणारं हे गीत सचिन पाठक यांनी लिहिलं आहे. तर समीर साप्तीस्कर यांनी या गाण्याला संगीत दिलं आहे. रोहित शिलवंत दिग्दर्शित ‘परी हूँ मैं’ या आगामी चित्रपटात एका मध्यमवर्गीय कुटुंबाचा ध्येयापर्यंतचा प्रवास मांडण्यात आला आहे.


कलाकार कोण?

या चित्रपटात नंदू माधव, देविका दफ्तरदार, श्रुती निगडे, फ्लोरा सैनी हे दमदार कलाकार आहेत. डॉ. राजेंद्र प्रताप सिंह आणि शीला राजेंद्र सिंह हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. तर चित्रपटाचे छायांकन रोहन मडकईकर यांनी केलं असून कला दिग्दर्शनाची जबाबदारी नरेंद्र भगत सांभाळत आहेत. सहनिर्माते संजय गुजर असून क्रिएटिव्ह प्रोड्युसर कुणाल मेहता आहेत.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा