Advertisement

'बबन'सिनेमातील रोमॅन्टीक गाणं प्रदर्शित


'बबन'सिनेमातील रोमॅन्टीक गाणं प्रदर्शित
SHARES

व्हेलेंटाईन डे निमित्ताने बबन सिनेमातील 'जगण्याला पंख फुटले' हे रोमॅन्टीक गाणं प्रेमीजनांसाठी लाँच करण्यात आलयं. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त 'ख्वाडा' फेम दिग्दर्शक भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे दिग्दर्शित आणि लिखित 'बबन' या आगामी सिनेमातील हे गाणे आहे. नुकतेच या सिनेमाचे पोस्टर आणि गाणं मोठ्या दिमाखात लाँच करण्यात आलं. ग्रामीण भागातील प्रेमकहाणी दाखवणारा हा सिनेमा येत्या २३ मार्च रोजी प्रदर्शित होत आहे.

प्रेमाची परिभाषा मांडणाऱ्या या गाण्याचे लेखन प्रोफेसर डॉक्टर विनायक पवार यांनी केले आहे, तर संगीतदिग्दर्शक हर्षीत अभिराजची यांनी या गाण्याला सुंदक चाल दिलेली आहे. या गाण्याला आवाज अन्वेशा दत्ता गुप्ता आणि ओंकारस्वरूप यांनी दिला आहे.


काय आहे बबन?

'बबन' हा सिनेमा एका ग्रामीण युवकावर आधारीत आहे. जो आपल्या वडिलांचा व्यवसाय सांभळताना आपल्या कॉलेजचं शिक्षण पुर्ण करतोय. आणि कॉलेजमध्ये तो एका मुलीच्या प्रेमात पडतो. आजच्या तरुण पिढीचं भावविश्व आणि त्यांची महत्वाकांक्षा या सिनेमातून पाहायला मिळणार आहे.

'ख्वाडा' अभिनेता भाऊसाहेब शिंदेची यात प्रमुख भूमिका असून, त्याच्यासोबत गायत्री जाधव ही नवोदित अभिनेत्री 'बबन' मध्ये झळकणार आहे. द फोक कोनफ्लूअन्स एन्टरटेंन्मेंट प्रस्तुत आणि चित्राक्ष फिल्म्स निर्मित या सिनेमाची विठ्ठलराव कऱ्हाडे, प्रमोद भास्कर चौधरी, मोनाली संदीप फंड आणि भाऊसाहेब शिंदे यांनी निर्मिती केली आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा