Advertisement

जल्लोष 'टकाटक'च्या सक्सेसचा

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या एकाच चित्रपटाची चर्चा आहे तो म्हणजे 'टकाटक'. चौथ्या आठवड्यापर्यंत बॅाक्स आॅफिसवर मिळालेलं यश 'टकाटक'च्या टीमनं सक्सेस पार्टीच्या रूपात साजरं केलं.

जल्लोष 'टकाटक'च्या सक्सेसचा
SHARES

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या एकाच चित्रपटाची चर्चा आहे तो म्हणजे 'टकाटक'. चौथ्या आठवड्यापर्यंत बॅाक्स आॅफिसवर मिळालेलं यश 'टकाटक'च्या टीमनं सक्सेस पार्टीच्या रूपात साजरं केलं.


बॉक्स ऑफिसच काबीज

'टकाटक'ला मिळालेलं यश मराठी चित्रपटसृष्टीसाठी खूप महत्त्वाचं असल्याचं मानलं जात आहे. पहिल्या सहा महिन्याच्या अखेरीस प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या व्यवसायानं जणू मराठी चित्रपटसृष्टीत आशेचा नवा किरणच दाखवला आहे. पहिल्या सहा महिन्यांमध्ये प्रदर्शित झालेल्या जवळजवळ ७३ सिनेमांमध्ये केवळ तीन चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले होते. असं असताना जून महिन्याच्या अखेरच्या आठवडयात प्रवाहापेक्षा काहीतरी वेगळं देणारा 'टकाटक' हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आणि बघता बघता 'टकाटक' बिझनेस करत त्यानं बॉक्स ऑफिसच काबीज केलं. 


ब्लॉकबस्टर 

मिलिंद कवडेच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या 'टकाटक'नं सक्सेस पार्टीच्या रूपात आपला आनंद सेलिब्रेट केला. प्रथमेश परब, रितीका श्रोत्री या मुख्य जोडीसोबत अभिजीत आमकर आणि प्रणाली भालेराव यांनी 'टकाटक'मध्ये केलेली धम्माल सक्सेस पार्टातही पहायला मिळाली. प्रथमेशच्या नावापुढील 'दगडू' आता गेला असून, त्याची जागा 'टकाटक'मधील 'ठोक्या'नं घेतली आहे. प्रथमेशलाही याचा आनंदच आहे. प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनावर ठसावी असाच आपला प्रयत्न असतो. 'टकाटक'मधील ठोक्यानं ते काम चोख बजावल्याचं समाधान आहेच, पण त्यासोबतच 'टकाटक' ब्लॉकबस्टर झाल्याचा खूप आनंद असल्याची भावना प्रथमेशनं व्यक्त केली आहे.


सेक्स कॉमेडीचा तडका 

'टकाटक'च्या माध्यमातून सेक्स कॉमेडी सादर करणं ही खरं तर खूप मोठी रिस्क होती. ही रिस्क मोठया हिमतीनं स्वीकारत एक सशक्त कंटेंट असलेला चित्रपट प्रेक्षकांसमोर आणल्यानं दिग्दर्शक या नात्यानं रसिकांकडून कौतुक होत असल्याची भावना मिलिंदनं व्यक्त केली. हा रसिक मायबापाच्या मनाचा मोठेपणा असल्याचं मिलिंद मानतो. केवळ सेक्स कॉमेडीचा तडका या चित्रपटाच्या कथानकाला असल्यानं थोडी रिस्क होती, पण रिस्कशिवाय यश मिळत नाही हे 'टकाटक'नं पुन्हा एकदा सिद्ध केल्याचं मिलिंदचं म्हणणं आहे.


वितरकांचा मोलाचा वाटा 

या यशात ओम प्रकाश भट्ट, सुजय शंकरवार, रवी बाहरी, इंदरजीत सिंग, अजय ठाकूर, धनंजय सिंग मासूम, रबिंद्र चौबे या निर्मात्यांचा खूप मोलाचा वाटा आहे. त्यांनी जर फ्री हँड दिला नसता तर 'टकाटक'सारख्या चित्रपटाचा विषय इतक्या प्रभावीपणं मांडणं सोपं गेलं नसतं. 'टकाटक'ला मिळालेल्या यशाचा आनंद साजरा करताना आपण निर्मिती केलेला चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असल्याचंच खूप मोठं समाधान लाभल्याचीच भावना सर्व निर्मात्यांकडून व्यक्त होत आहे. या यशामुळं भविष्यात आणखी चांगल्या चित्रपटांची निर्मिती करण्यासाठी बळ आणि ऊर्जा मिळाल्याचं त्यांचं म्हणणं आहे. यशाच्या या वाटेवर समीर दीक्षित आणि ह्षिकेश भिरंगी या वितरकांचाही खूप मोलाचा वाटा आहे. 


अर्थपूर्ण संवादलेखन

प्रथमेश-रितीका, अभिजीत-प्रणाली यांच्यासोबतच भारत गणेशपुरे, प्रदीप पटवर्धन, आनंदा कारेकर आदी कलाकारांनीही धम्माल केली आहे. गायक आनंद शिंदे यांच्या आवाजातील 'आपला हात जगन्नाथ...', या गाण्यासोबतच जय अत्रेनं लिहिलेलं आणि श्रुती राणे यांनी गायलेलं 'ये चंद्राला या...', हे हॉट रोमँटिक गाणंही चांगलंच गाजत आहे. संगीतकार वरूण लिखते यांनी या चित्रपटातील गीतांना संगीत दिलं आहे. मिलिंद कवडे यांनी अजय ठाकूर यांच्या साथीनं या चित्रपटाची गंमतीशीर कथा-पटकथा लिहिली आहे. संजय नवगीरे यांनी अर्थपूर्ण संवादलेखन केलं आहे.



हेही वाचा  -

मोदींच्या 'मां की रसोई'ला वहिदा-आशाताईंसह पत्की-टिळेकरांचा स्पर्श

Exclusive : चार भाषांमध्ये रिमेकची 'टकाटक' आॅफर!





संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा