Advertisement

Exclusive : चार भाषांमध्ये रिमेकची 'टकाटक' आॅफर!

प्रेक्षकांना कधी आणि काय आवडेल याचा अंदाज बांधणं कठीण असल्याचं 'टकाटक' या मराठी चित्रपटानं पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे. तिकिटबारीवर धडाकेबाज कलेक्शन करणाऱ्या या चित्रपटाला चार भाषांमध्ये रिमेकची आॅफर मिळाल्याची माहिती मिळाली आहे.

Exclusive : चार भाषांमध्ये रिमेकची 'टकाटक' आॅफर!
SHARES

प्रेक्षकांना कधी आणि काय आवडेल याचा अंदाज बांधणं कठीण असल्याचं 'टकाटक' या मराठी चित्रपटानं पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे. तिकिटबारीवर धडाकेबाज कलेक्शन करणाऱ्या या चित्रपटाला चार भाषांमध्ये रिमेकची आॅफर मिळाल्याची माहिती मिळाली आहे.


घवघवीत यश

जून महिन्याच्या अखेरीस प्रदर्शित झालेला मिलिंद कवडे दिग्दर्शित 'टकाटक' हा मराठी चित्रपट सध्या तिकिटबारीवर धुमाकूळ घालत आहे. पर्पल बुल एंटरटेनमेंट प्रा. लि., व्ही. पतके फिल्म्स आणि गांववाला क्रिएशन्सची निर्मिती असलेल्या या चित्रपटानं 'ए' सर्टिफिकेट असूनही मिळवलेला प्रतिसाद कौतुकास्पद तर आहेच; परंतु मराठी चित्रपटसृष्टीसाठीही ही दिलासादायक बाब आहे. भाषा आणि सादरीकरण बोल्ड असल्यानं केवळ सज्ञान प्रेक्षकांसाठी परवानगी मिळवलेला हा चित्रपट तरुणी व महिलाही एन्जॅाय करत असल्याचं चित्र महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये पहायला मिळत आहे. याच बळावर 'टकाटक'नं कोटीच्या कोटी उड्डाणं घेत बॅाक्स आॅफिसवर घवघवीत यश मिळवलं आहे.


हिंदी रिमेकची आॅफर 

पहिल्या तीन दिवसांमध्ये तीन कोटी रुपयांहून अधिक व्यवसाय करणाऱ्या 'टकाटक'नं पहिल्या आठवड्यात १० कोटी, तर तिसऱ्या आठवड्यात १४ कोटी रुपयांचा आकडा पार केल्याचं चित्रपटाच्या टिमकडून सांगण्यात येत आहे. याच बळावर 'टकाटक'नं हिंदी चित्रपटसृष्टीचंही लक्ष वेधून घेतलं आहे. मराठी चित्रपटसृष्टीवर बारकाईन नजर ठेवून असलेल्या बॅालीवुडमधून 'टकाटक'च्या हिंदी रिमेकची आॅफर आली असल्याची एक्सक्लुझीव्ह माहिती 'मुंबई लाइव्ह'ला चित्रपटाशी निगडीत असलेल्या सूत्रांकडून मिळाली आहे. इतकंच नव्हे तर हिंदीसोबतच या चित्रपटाचा तमिळ, तेलुगू आणि गुजराती भाषेत रिमेक करण्यासाठी विचारणा करण्यात आल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. हिंदी, तमिळ, तेलुगू आणि गुजरातीमध्ये कोणते निर्माते-दिग्दर्शक 'टकाटक'चा रिमेक करण्यासाठी पुढे सरसावले आहेत याबाबतची माहिती मात्र समजलेली नाही.

 

कलेक्शनचा आकडा वाढणार

मराठी चित्रपटांचा हिंदी रिमेक होणं ही तशी नवी गोष्ट नाही, पण चित्रपटगृहांमध्ये सुरू असणाऱ्या एखाद्या चित्रपटाला चक्क चार भाषांमध्ये रिमेकची आॅफर येणं हे बहुधा क्वचितच घडलं असेल. यामुळंच 'टकाटक'ला मिळालेलं हे यश काहीसं वेगळं आहे. 'टकाटक'चे निर्माते ओम प्रकाश भट्ट, सुजय शंकरवार, रवी बाहरी, इंदरजीत सिंग, अजय ठाकूर, धनंजय सिंग मासूम, रबिंद्र चौबे यांच्यासह प्रथमेश परब, रितीका श्रोत्री, अभिजीत आमकर, प्रणाली भालेराव हे मुख्य कलाकार, तसंच पिकल एन्टरटेन्मेंटचे समीर दीक्षित ही सर्व मंडळी सध्या सक्सेस पार्टीच्या मूडमध्ये आहेत. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील काही चित्रपटगृहांनी चौथ्या आठवड्यातही 'टकाटक'चे शो कंटीन्यू ठेवले आहेत. त्यामुळं 'टकाटक'च्या कलेक्शनचा आकडा आणखी वाढणार हे निश्चित.



हेही वाचा  -

१५ आॅगस्टच्या रेसमधून 'साहो' बाहेर




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा