Advertisement

'मुंबई पुणे मुंबई' 3 'ऑन द वे'


'मुंबई पुणे मुंबई' 3 'ऑन द वे'
SHARES

मुंबई पुणे मुंबई-१’ हा चित्रपट बरोब्बर आठ वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. त्यावेळी तो राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुपरडूपर हिट ठरला. या चित्रपटाचा पुढचा भाग ‘मुंबई पुणे मुंबई-२’ दोन वर्षांपूर्वी आला आणि त्यावेळीही यशाच्या इतिहासाची पुनरावृत्ती झाली. आताही ही यशोगाथा पुन्हा लिहिली जाणार आहे.


प्रदर्शनाचा मुहूर्त?

चित्रपटाचे निर्माते संजय छाब्रिया आणि सह-निर्माते अमित भानुशाली (फ्रायडे सिनेमाज) आणि दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी ‘मुंबई पुणे मुंबई’च्या तिसऱ्या भागाची घोषणा केली आहे.

स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे ही हिट जोडी या तिसऱ्या भागातही झळकणार आहेत. या घोषणेच्यावेळी हे दोघेही हजर होते. हा सिनेमा 'ऑन द वे' असून २८ सप्टेंबर २०१८ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मुंबई पुणे मुंबई’ला एवढे यश मिळेल असे आम्हाला सुरुवातीला वाटलेच नव्हते. ‘मुंबई पुणे मुंबई’ हा आता एक वेगळा ट्रेंड झाला असून प्रेमकथेचा एक वेगळा बाज त्यातून गिरवला गेला आहे. आता लोकांना गौतम आणि गौरी यांच्या आयुष्यात काय घडत आहे, त्याबद्दल जिज्ञासा लागून राहिलेली असते. या जोडप्याच्या आयुष्यात ज्या घोष्टी घडतात त्यांचा संबंध लोक आपल्या आयुष्याशी जोडू लागले आहेत.
- सतीश राजवाडे, दिग्दर्शक

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा