Advertisement

'भाई.. व्यक्ती की वल्ली' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित


'भाई.. व्यक्ती की वल्ली' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
SHARES

लेखक, गीतकार, संगीतकार, गायक, दिग्दर्शक, अभिनेते असं अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे पु. . देशपांडे यांच्या जीवनावर आधारीत चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. आजवर त्यांच्या साहित्यकृतींवर अनेक चित्रपट,नाटकं प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. परंतु पहिल्यांदाच पुलंच्या जीवनावर आधारित 'भाई.. व्यक्ती की वल्ली' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

चित्रपटाची निर्मिती दिग्दर्शक महेश मांजरेकर करत अाहेत. महेश मांजरेकर यांच्या ‘फाळकेज् फॅक्टरी’ या निर्मिती संस्थेअंतर्गंत ‘भाई.. व्यक्ती की वल्ली’ या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून भाईंच्या जीवनातील महत्वपूर्ण घटनांवर प्रकाश टाकण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे ‘हंटर’, ‘वायझेड’ चित्रपटामध्ये झळकलेला सागर देशमुख पु..देशपांडे यांची भूमिका साकारणार आहे. तर इरावती हर्षेने सुनिताबाईंची भूमिका साकारली आहे. दरम्यान, या चित्रपटामध्ये पु. . देशपांडे, सुनीताबाई देशपांडे यांच्याबरोबरच जवाहरलाल नेहरू, बाळासाहेब ठाकरे, बाबा आमटे, भीमसेन जोशी, दुर्गा भागवत, वसंतराव देशपांडे, कुमार गंधर्व अशा अनेक व्यक्तिमत्त्वांचा समावेश आहे. हा चित्रपट पुढील वर्षी ४ जानेवारी २०१९ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


हेही वाचा

ओम-मालविकाची ‘गुलाबी धांदल’

जयंत सावरकर, विनायक थोरात यांना शासनाचा रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार जाहीर
संबंधित विषय
Advertisement