Advertisement

ओम-मालविकाची ‘गुलाबी धांदल’

बहुतेकांच्या जीवनात चहा एक महत्त्वपूर्ण घटक बनला आहे. चहासाठी ठराविक वेळ नसली, तरी वेळेला मात्र चहा लागतोच असं बरेच चहाप्रेमी म्हणत असतात. चहाची हीच गुलाबी धांदल आता मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे.

ओम-मालविकाची ‘गुलाबी धांदल’
SHARES

चित्रपटसृष्टीत नेहमीच नवनवीन जोड्या जुळत असतात. यापैकी काहींची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच भावते. अशाच एका नवीन जोडीची ‘गुलाबी धांदल’ प्रेक्षकांना लवकरच रुपेरी पडद्यावर पहायला मिळणार आहे.



चहा आणि प्रेमाचा संगम 

बहुतेकांच्या जीवनात चहा एक महत्त्वपूर्ण घटक बनला आहे. चहासाठी ठराविक वेळ नसली, तरी वेळेला मात्र चहा लागतोच असं बरेच चहाप्रेमी म्हणत असतात. चहाची हीच गुलाबी धांदल आता मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे. आजवर आपण प्रेमाची परिभाषा मांडणारी अनेक गाणी ऐकली आणि बघितलीही असतील, पण कधी वाफाळलेला कडक चहा आणि प्रेमाचा संगम अनुभवलाय? 


हटके केमिस्ट्री

प्रविण तरडे लिखित, दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटात चहाभोवती फिरणारी प्रेमी युगुलाची हटके केमिस्ट्री ‘उन उन…’ या गाण्यात पाहायला मिळणार आहे. ‘मुळशी पॅटर्न’मध्ये राष्ट्रीय पारितोषिक विजेता अभिनेता ओम भूतकर मुख्य भूमिकेत आहे, तर मालविका गायकवाड या चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. याच फ्रेश जोडीवर ‘उन उन…’ हे काहीसं वेगळ्या धाटणीचं रोमँटिक गाणं चित्रित करण्यात आलं आहे.


प्रेमाचा नवा आशय 

वैशाली माडे आणि अवधूत गुप्ते यांचा आवाज लाभलेलं ‘उन उन…’ हे गाणं गीतकार प्रणित कुलकर्णी असून नरेंद्र भिडे यांनी संगीतबद्ध केलं आहे. ‘उन उन व्हटातून गुलाबी धांदल, वाफाळल्या पीरमाची मोगरी मलमल…’ अशी शब्दरचना असलेल्या गाण्यातून चहाच्या वाफेसोबत दोघांच्याही मनातील प्रेमाला उकळी फुटलेली दिसते. चहासारखं रोजच्या जगण्यातील पेय प्रेमाच्या नजरेतून बघण्याचा हा पहिलाच प्रयोग म्हणावा लागेल. प्रेमाचा नवा आशय आणि सतत गुणगुणत रहावीशी वाटणारी चाल ही या गाण्याची खास वैशिष्ट्ये आहेत. ‘मुळशी पॅटर्न’ च्या दिर्ग्शनासोबतच प्रविण तरडे यांनीच या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद लिहिली आहे. 



हेही वाचा - 

'रंगीला राजा' सेन्साॅरच्या कात्रीत, निहलानींची कोर्टात धाव

जयंत सावरकर, विनायक थोरात यांना शासनाचा रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार जाहीर




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा