रीमा-मोहन यांच्या ‘होम स्वीट होम’चा काव्यमय टीझर

‘होम स्वीट होम’ या आगामी मराठी सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या टीझरमध्ये रीमा आणि मोहन जोशी यांची केमिस्ट्री पाहायला मिळते.

SHARE

दिवंगत अभिनेत्री रीमा लागू यांची मध्यवर्ती भूमिका असलेल्या ‘होम स्वीट होम’ या आगामी मराठी सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या टीझरमध्ये रीमा आणि मोहन जोशी यांची केमिस्ट्री पाहायला मिळते.

फ्रेम्स प्रॉडक्शन्स कंपनी प्रा. लि. निर्मित, प्रोअॅक्टिव्ह आणि स्वरुप रिक्रीएशन्स अँड मिडिया प्रा. लि. प्रस्तुत ‘होम स्वीट होम’ या मराठी चित्रपटाच्या टीझरमध्ये रीमा आणि मोहन जोशी यांच्या आॅनस्क्रीन नात्याचा गोडवा विषद करण्यात आला आहे. 


काय आहे टीझरमध्ये?

सोबतीला कवी, गीतकार वैभव जोशी यांची ‘नात्याचे रुटीन चेकअप’ सांगणारी त्यांच्याच आवाजातील सुंदर कविता आहे. नात्यात संवादांचं प्रेशर जपणं असेल, खाण्यासंबंधीचं पथ्य असेल, अथवा दाम्पत्यातील खट्याळपणा असेल, अशा सर्वच बाबी टीझरमध्ये कवितेच्या रुपाने सादर केल्या आहेत.

३५ वर्षे एकाच घरात वास्तव्य केलेल्या दाम्पत्याच्या मनात घराविषयी असणारं स्थान टीझरमध्ये उल्लेखलेलं आहे. टीझरच्या शेवटी प्रसाद ओक, विभावरी देशपांडे आणि हृषिकेश जोशी दारातून डोकावताना दिसतात.


सिनेमात यांच्या भूमिका

या अत्यंत हृदयस्पर्शी टीझरमधून ‘होम स्वीट होम’बद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्कंठा निर्माण होणं साहाजिक आहे. अभिनेता, लेखक हृषिकेश जोशी ‘होम स्वीट होम’मधून दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहे. या चित्रपटात दिवंगत रीमा-मोहन यांच्यासोबत हृषीकेश जोशी, स्पृहा जोशी, प्रसाद ओक, विभावरी देशपांडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

आयुष्यात आपल्या घराचं स्थान काय असतं? हे विषद करताना जीवनातील अनेक पैलूंवर प्रकाश टाकणारा ‘होम स्वीट होम’ २८ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.


हेही वाचा -

‘होम स्वीट होम’मध्ये पुन्हा भेटणार रिमा

संबंधित विषय
ताज्या बातम्या