शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेसाठी अनेकांनी मोलाचं योगदान दिलं होतं. असंख्य मावळ्यांच्या शौर्याने आणि त्यागाने स्वराज्य स्थापन झालं. यापैकीच एक असलेल्या ‘कोंडाजी फर्जंद’ या शिलेदाराच्या असामान्य शौर्याची कथा ‘फर्जंद’ या आगामी मराठी सिनेमात पहायला मिळणार आहे.
या सिनेमाच्या निमित्ताने इतिहासाच्या पानांमधील आतापर्यंत समोर न आलेल्या अनेक लढवय्या व्यक्तिरेखा समोर येणार आहेत. ‘फर्जंद’ हा सिनेमा १ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन करणाऱ्या दिग्पाल लांजेकर यांनी इतिहासाच्या पानांत लुप्त झालेल्या अनेक महान व्यक्तिरेखांना ‘फर्जंद’ या सिनेमाद्वारे समोर आणालं आहे.
या सिेनेमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत चिन्मय मांडलेकर आणि कोंडाजी फर्जंद या नायकाच्या भूमिकेत अंकित मोहन दिसणार आहेत. इतर व्यक्तिरेखांसाठीही दिग्पालने दिग्गज कलाकारांची निवड केली आहे. या सिनेमात अभिनेता अजय पुरकर यांनी मोत्याजी मामा ही व्यक्तिरेखा साकारली आहे, तर आस्ताद काळे गुंडोजीची भूमिका निभावणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात अनेक शिलेदारांचं मोलाचं योगदान आहे. मोत्याजी मामा, गुंडोजी, अनाजी पंत, हिरोजी इंदुलकर, गणोजी, मारत्या रामोशी, भिकाजी यांचाही त्यात समावेश आहे.
‘फर्जंद’ या सिनेमात ‘कोंडाजी फर्जंद’ यांची कथा असली तरी कोंडाजीप्रमाणेच स्वराज्याच्या जडणघडणीत सहभागी असलेल्या तत्कालीन नायकांचं कार्य समोर यावं या उद्देशाने त्यांच्यावर फोकस केला आहे. यांच्या भूमिका फार मोठ्या नसल्या तरी त्या प्रभावीपणे मनावर ठसतील याची दक्षता घेण्यात आली आहे.
- दिग्पाल लांजेकर, दिग्दर्शक