Advertisement

सप्टेंबरमध्ये सिनेमागृहांमध्ये दरवळणार ‘परफ्युम’

‘परफ्युम’चा सुगंध सप्टेंबरमध्ये महाराष्ट्रातल्या सर्व सिनेमागृहांमध्ये दरवळणार आहे. ‘परफ्युम’चं टीजर आणि पोस्टर नुकतंच सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं. चित्रपटाच्या नावासारखंच याचं पोस्टरही व्हायब्रंट आहे.

सप्टेंबरमध्ये सिनेमागृहांमध्ये दरवळणार ‘परफ्युम’
SHARES

सिनेमाचं शीर्षक लक्ष वेधणारं असलं की त्याची चर्चा सुरू व्हायला वेळ लागत नाही. याच कारणामुळे काही दिग्दर्शक आपल्या सिनेमाचं शीर्षक फार विचारपूर्वक ठेवतात. दिग्दर्शक करण तांदळे यांनीही ‘परफ्युम’ असं काहीसं सुगंधी शीर्षक आपल्या आगामी सिनेमाला दिलं आहे. या ‘परफ्युम’चा सुगंध सप्टेंबरमध्ये महाराष्ट्रातल्या सर्व सिनेमागृहांमध्ये दरवळणार आहे.


काय आहे या पोस्टरमध्ये?

‘परफ्युम’चं टीजर आणि पोस्टर नुकतंच सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं. चित्रपटाच्या नावासारखंच याचं पोस्टरही व्हायब्रंट आहे. सायकलवर बसून एकमेकांच्या हातात हात असलेलं कपल या पोस्टरमध्ये दिसतं. रंगांची मुक्त उधळण असलेल्या या पोस्टरमधून चित्रपटाची कथा ही विविधरंगी आहे, हे व्यक्त होतं. त्यामुळे प्रेमाचं, नात्यांचं, तरुणाईच्या मानसिकतेचं पदर उलगडून दाखवणाऱ्या चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.


चित्रपटाचे निर्माते?

ओंकार दीक्षित आणि मोनालिसा बागल ही जोडी या चित्रपटात पहायला मिळणार आहे. ‘हलाल’ या गाजलेल्या चित्रपटाची निर्मिती केलेल्या, तसंच आगामी ‘लेथ जोशी’ चित्रपटाची प्रस्तुती करणाऱ्या अमोल कागणे स्टुडिओजचे अमोल कागणे आणि लक्ष्मण कागणे यांनीच ‘परफ्युम’ची प्रस्तुती केली आहे. तर एचआर फिल्मडॉमच्या डॉ. हेमंत दीक्षित आणि ओंकार दीक्षित यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे

दिग्दर्शनासोबतच कॅमेरामन म्हणूनही करण तांदळे यांनीच काम पाहिलं आहे. ओंकार आणि मोनालिसासह चिन्मय मांडलेकर, अभिजित चव्हाण, सयाजी शिंदे, अनिल नगरकर, कमलेश सावंत, भाग्यश्री न्हालवे असे अनुभवी कलाकारही या चित्रपटात आहेत.


हेही वाचा -

सप्टेंबरमध्ये दरवळणार ‘परफ्युम’!

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा