SHARE

मराठी सिनेमांनी अलीकडच्या काळात आशय विषयासोबतच शीर्षकांमध्येही वेगळेपण जपण्याचं काम केलं आहे. ‘परफ्युम’ हा चित्रपट त्यापैकीच आहे. ओंकार दीक्षित आणि मोनालीसा बागल या नव्या जोडीचा ‘परफ्युम’ सप्टेंबरमध्ये दरवळणार आहे.


यांनी केलं परफ्युमचं दिग्दर्शन?  

एचआर फिल्मडॉमच्या डॉ. हेमंत दीक्षित आणि ओंकार दीक्षित यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘हलाल’सारख्या गाजलेल्या चित्रपटाची निर्मिती केलेल्या आणि आगामी ‘लेथ जोशी’ चित्रपटाची प्रस्तुती करणाऱ्या अमोल कागणे स्टुडिओजचे अमोल कागणे आणि लक्ष्मण कागणे यांनी ‘परफ्युम’ची प्रस्तुती केली आहे. दिग्दर्शक आणि कॅमेरामन म्हणून करण तांदळे यांनी काम पाहिलं आहे.


या कलाकारांच्या भूमिका

ओंकार आणि मोनालिसासह चिन्मय मांडलेकर, अभिजित चव्हाण, सयाजी शिंदे, अनिल नगरकर, कमलेश सावंत, भाग्यश्री न्हालवे असे उत्तम आणि अनुभवी कलाकारही या चित्रपटात आहेत.

‘परफ्युम’ असं सुगंधित शीर्षक असल्याने या चित्रपटाच्या कथानकाविषयी उत्सुकता निर्माण झाली असली तरी चित्रपटाविषयीच्या इतर माहितीसाठी अजून थोडीच वाट पाहावी लागणार आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या