Advertisement

धमाल मस्तीने भरलेला 'शिकारी'


धमाल मस्तीने भरलेला 'शिकारी'
SHARES

भालचंद्र कदम, भारत गणेशपुरे आणि वैभव मांगले या कलाकारांची धमाल मस्ती प्रेक्षकांना शिकारी या सिनेमातून अनुभवता येणार आहे. २० एप्रिल रोजी प्रदर्शित होणाऱ्या या मराठी चित्रपटाची रसिकांमध्ये चांगलीच चर्चा सुरू आहे.


यांच्याही महत्त्वाच्या भूमिका

महेश मांजरेकर यांचं सादरीकरण असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन आघाडीचे दिग्दर्शक विजू माने करत आहेत. या चित्रपटाची बोल्ड पोस्टर्स सर्वत्र झळकली आणि या चित्रपटाची चर्चा सुरू झाली. ‘अ लाफ रायट, अ सेक्स कॉमेडी विथ अ मेसेज’ असे ब्रीदवाक्य घेवून ही पोस्टर्स झळकली आहेत. नेहा खान हिची मध्यवर्ती भूमिका या चित्रपटात आहे, तर तेवढीच महत्वाची भूमिका ‘दिल दोस्ती दुनियादारी’ फेम सुव्रत जोशीने यात साकारली आहे. त्यांच्याबरोबर भालचंद्र कदम, भरत गणेशपुरे आणि वैभव मांगले, कश्मीरा शाह, मृण्मयी देशपांडे, प्रसाद ओक, सिद्धार्थ जाधव, संदेश उपश्याम, जीवन कराळकर आणि दुर्गेश बडवे यांच्याही महत्वाच्या भूमिका यात आहे.


अंदाज वेगळा

भालचंद्र कदम, भरत गणेशपुरे आणि वैभव मांगले या विनोदवीरांमुळे या चित्रपटाला एक वेगळा दर्जा प्राप्त झाला आहे. त्याचमुळे, वेगळ्या धाटणीचा, बोल्ड अशी या चित्रपटाची ओळख प्रस्थापित झाली आहे. त्याचबरोबर या चित्रपटाने मनोरंजनाच्या पातळीवरही वेगळ्या अपेक्षा निर्माण केल्या आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा