Advertisement

नृत्यातून मांडली संतगाथा


नृत्यातून मांडली संतगाथा
SHARES

दादर - नालंदा नृत्य कला महाविद्यालयाने “संतगाथा”हा कार्यक्रम आयोजित केला होता. भारताला मोठी अशी संत परंपरा लाभली आहे. याच परंपरेतील काही संताची माहिती या कार्यक्रमात नृत्याद्वारे दिली गेली. रवींद्र नाट्य मंदिरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून संजय देशमुख (कुलगुरू,मुंबई विद्यापीठ) कनक रेळे (संचालक,नालंदा नृत्य कला महाविद्यालय) उमा रेळे (मुख्याध्यापिका, नालंदा नृत्य कला महाविद्यालय) हे उपस्थित होते. नृत्याच्या माध्यमातून जनसमुदायास एकसमान मानणारे संत कबीर, गणिकेची मुलगी असूनही कृष्णावर प्रेम करून त्याच्यासाठी अभंग म्हणणारी संत कान्होपात्रा, कृष्णाच्या प्रेमामध्ये लीन असणारी संत मीराबाई, राम नावाचं खरे पवित्र्य समजावून सांगणारे संत तुलसीदास, आयुष्याचा खरा अर्थ सांगणारे संत रहीम यांच्या कथा मांडल्या.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा