मुंबईचे 'गली बॉईज', जिंकलं 'अमेरिका गॉट टॅलेंट'

वसई-भाईंदर आणि धारावीच्या कलाकारांनी या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. अखेर या मुलांनी ही स्पर्धा जिंकून भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

SHARES

नुकताच अमेरिकेत पार पडलेल्या ‘अमेरिका गॉट टॅलेंट’ या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. वसई-भाईंदर आणि धारावीच्या कलाकारांनी या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करून या कलाकारांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे.

चित्तथरारक नृत्याविष्कार सादर

वसई-भाईंदर इथल्या ‘व्ही अनबिटेबल’ डान्स ग्रुपला या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली होती. ‘अमेरिका गॉट टॅलेंट’मध्ये मागच्या वेळीही त्यांनी सहभागी होऊन स्थान पटकावलं होतं. पण त्यानंतर ऑक्टोबरमध्ये पार पडलेल्या दुसऱ्या पर्वात या स्पर्धकांनी चित्तथरारक नृत्याविष्कार सादर करून अमेरिकेच्या रसिकांची मने जिंकली.'या' गाण्यावर सादर केला डांस

'अमेरिका गॉट टॅलेंट'मध्ये 'व्ही अनबीटेबल'ने रणवीर सिंगच्या चित्रपटाच्या रामलीलातील' तट्टर तट्टर' या गाण्यावर डांस सादर केला. या ग्रुपचा स्टंट आणि डान्स पाहून तिथं उपस्थित सर्व लोक आश्चर्यचकित झाले. अमेरिका गॉट टॅलेंटनं आपल्या ट्विटर हँडलवर 'वी अनबेटटेबल' चा व्हिडिओ शेअर केला आहे.


परीक्षकांसह प्रेक्षकांनी केलं कौतुक

अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, कॅनडा या देशांसह विविध देशांतील ४० संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यामधून ‘व्ही अनबिटेबल ग्रूप’नं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळवलं आहे. या नृत्यपथकाला ज्यावेळी प्रथम क्रमांक मिळाल्याची घोषणा झाली, त्यावेळी परीक्षकांसह प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात या स्पर्धकांचं कौतूक केलं.

भारतातील विविध स्पर्धेत सहभागी होत या स्पर्धकांनी आपले नृत्य कौशल्य दाखवलं आहे. हे स्पर्धक चित्तथरारक  स्टंट आणि नृत्य यांसाठी प्रसिद्ध आहेत. मुंबईच्या उपनगरातील नायगाव आणि भाईंदरमधील ३० मुलांचा ‘व्ही अनबिटेबल ग्रूप’मध्ये समावेश आहे. स्वप्निल भोईर आणि ओमप्रकाश चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली या मुलांनी आपली कला सादर केली.


काय म्हणाला रणबीर?

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगनंही 'व्ही अनबीटेबल' डान्स ग्रुपच्या विजयावर आपल्या भावना व्यक्त केल्या. डान्स ग्रुपनं शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये रणवीर सिंग म्हणत आहे की, "मला खूप आनंद झाला की आम्ही अमेरिकेच्या गॉट टॅलेंटच्या फायनलमध्ये प्रवेश केला. त्यांचा डांस अभूतपूर्व आहे. त्यांना माझ्याकडून शुभेच्छा. जागतिक व्यासपीठावर आपण जे काही साध्य केलं त्याचा मला अभिमान आहे. जागतिक मंचावर अशा प्रकारे डांस करून देशाची मनं जिंकली आहेत.”हेही वाचा

अक्षय कुमारच्या 'सुर्यवंशी'ची तारीख बदलली, आता 'या'दिवशी प्रदर्शित होणार

सिद्धार्थ शुक्ला मारहाण करायचा, शिल्पा शिंदेचा गंभीर आरोप

संबंधित विषय