Advertisement

सिद्धार्थ शुक्ला मारहाण करायचा, शिल्पा शिंदेचा गंभीर आरोप

बिग बॉस १३ जिंकून आलेल्या सिद्धार्थ शुक्लावर शिल्पा शिंदेनं गंभीर आरोप केल्याचा दावा एका वेबसाईटन केला आहे. या संपूर्ण प्रकरणावर सिद्धार्थ शुक्लानं अखेर उत्तर दिलं आहे.

सिद्धार्थ शुक्ला मारहाण करायचा, शिल्पा शिंदेचा गंभीर आरोप
SHARES

'भाबीजी घर पर हैं' मध्ये अंगूरी भाभीच्या भूमिकेनं प्रसिद्ध झालेली अभिनेत्री आणि 'बिग बॉस ११' ची विजेता असेलल्या शिल्पा शिंदे (shilpa Shinde)नं सिद्धार्थ शुक्लाबद्दल (Siddharth Shukla) हैराण करणारा खुलासा केला आहे. शिल्पानं सांगितल्याप्रमाणे ती सिद्धार्थसोबत रिलेशनशिपमध्ये होती

तिची एक ऑडियो क्लिप समोर आली आहे, ज्यामध्ये ती सिद्धार्थसोबत बोलत आहे. ऑडियोमध्ये सिद्धार्थ शिल्पाला विचारात आहे की, ती त्याच्यासोबत या रिलेशनशिपमध्ये पुढे जाऊ इच्छिते की, तिला या नात्यातून बाहेर पडायचे आहे. मात्र, यामध्ये आवाज व्यवस्थित येत नाहीये, याबद्दल एका न्यूज वेबसाइटनं शिल्पासोबत बातचीत केली.

सिद्धार्थचा खुलासा

यासंपूर्ण प्रकरणावर बिग बॉस १३(Big Boss)चं पर्व जिंकून आलेल्या सिद्धार्थ शुक्लानं खुलासा केला आहे. बिग बॉसमध्ये असल्या कारणानं तो काही बोलू शकला नाही. पण नुकताच बिग बॉस जिंकून तो घराबाहेर आला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणावर त्यानं अखेर प्रतिक्रिया दिलीय

"पोलिसात केली होती तक्रार"

शिल्पानुसार, ती २०११ मध्ये सिद्धार्थसोबत नात्यामध्ये होती. शिल्पा म्हणाली, "ही बॉयफ्रेंड (सिद्धार्थ शुक्ला) आणि गर्लफ्रेंड (शिल्पा शिंदे) यांच्यातील गोष्ट आहे, बऱ्याच मारहाणीनंतर त्यानं मला चालत्या गाडीतून बाहेर फेकलं होतं. नेहमी मारायचा. मी त्याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रारही दाखल केली होती. हे खूप स्ट्रेच्ड रिलेशनशिप होतं. गळ्यातच पडतो तो माणूस. तो खूप काळ मला सोडण्यास नकार देत होता. कारण त्याचा ईगो दुखावला जायचा की, ही कशी काय मला सोडू शकते? मला म्हणायचा - तू सोडू कशी शकते ? सोडून तर पाहा?", असं शिल्पानं मुलाखतीत सांगितल्याचा दावा एका वेबसाईटनं केला आहे.

"मैत्रीचा चुकिचा अर्थ काढला"

सिद्धार्थसोबत शिल्पाची भेट एका लग्नात झाली होती. दोघं मित्र होते आणि काही कॉफी डेट्सलाही गेले होते. शिल्पा म्हणाली, "हे खूपच कॅज्युअल रिलेशनशिप होतं. पण तो याला वेगळ्याच पातळीवर घेऊन गेला. म्हणू लागला, 'तू टाइम पास कशी काय करू शकते? प्रेम नाहीये का तुझे?' पण तुम्ही कुणासोबत काही दिवस घालवल्यानंतर तुम्हाला प्रेम होतेच असं नाही"

"तो खूप रागीट आणि पझेसिव्ह होता"

सिद्धार्थसोबतच्या आपल्या नात्याबद्दल शिल्पा म्हणाली, "तो खूपच पझेसिव्ह, डिमांडिंग, रागीट आणि शिव्या देणारा होता. जर मी ट्रेस होत नसले तर तो फोन करायचा, सतत विचारपूस करायचा आणि अपशब्दांचा वापर करायचा. मग सॉरी म्हणायचं आणि पायातच पडायचा. जेव्हा त्याला 'बालिका वधू' सिरीयल मिळाली तेव्हा मी हळू हळू प्रेमानं त्याच्यापासून अंतर वाढवायला सुरुवात केली. हळू हळू असं करून प्रेमानं मी स्वतःला सोडवलं. खूप जास्त सायको आहे."

सिद्धार्थ काय म्हणाला?

शिल्पा शिंदेनं केलेल्या आरोपावर सिद्धार्थनं प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, "मी शिल्पाला खूप चांगल्या प्रकारे ओळखतो. मला नाही वाटत की ती असं काही बोलली असेल. मी आताच बिग बॉसच्या घरातून आलो आहे. मला याबद्दल काहीच माहिती नाही. मला पहिलं जाणून घेऊदे की शिल्पा काय बोलली आहे ते.”

आता खरं काय खोटं काय हे आपल्याला सांगणं कठिण आहे. या दाव्यांमध्ये किती तथ्य आहे हे शिल्पा आणि सिद्धार्थलाच माहिती असेल.   हेही वाचा

'बिग बॉस १३'चा विजेता ठरला सिद्धार्थ शुक्ला

'तेजस'चा फर्स्ट लूक प्रदर्शित, कंगना साकारतेय एअरफोर्स पायलटची भूमिका


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा