Advertisement

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र भूषण निवड समितीची बैठक पार पडली. यावेळी आशा भोसले यांच्या नावाची एकमताने घोषणा करण्यात आली.

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार
SHARES

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना राज्य शासनाचा २०२१ सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी  आशा भोसले यांची त्यांच्या लोअर परळस्थित निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. यावेळी संगीतकार राहुल रानडे यांच्यासह सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे अधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र भूषण पुरस्काराची घोषणा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून केली जाते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र भूषण निवड समितीची बैठक पार पडली. यावेळी आशा भोसले यांच्या नावाची एकमताने घोषणा करण्यात आली. 

महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची एकमताने निवड करणे हा राज्य सरकारचा बहुमानच असल्याचे मंत्री अमित देशमुख यांनी म्हटलं, तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार म्हणजे घरच्यांकडून झालेलं कौतुक आहे, या शब्दांत आशा भोसले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

राज्य सरकारकडून १९९६ मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यास सुरुवात झाली. पहिला पुरस्कार महाराष्ट्रचं लाडकं व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांना देण्यात आला होता. तर दुसरा पुरस्कार १९९७ मध्ये गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना देण्यात आला होता. महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळविणाऱ्या आशा भोसले या मंगेशकर घराण्यातील दुसऱ्या व्यक्ती आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा