• मुंबईत रंगणार कोल्ड प्ले
SHARE

वांद्रे - आधीच थंडीचे दिवस त्यात आता मुंबईकरांना कोल्ड प्लेचा अनुभव घेता येणार आहे. होय शनिवारी रात्री वांद्र्याच्या एमएमआरडीएच्या मैदानात कोल्ड प्लेची धूम याची देही याची डोळा मुंबईकरांना अनुभवता येणार आहे. शनिवारी वांद्र्याचं एमएमआरडीएचं मैदानं प्रेक्षक आणि पॉप स्टार यांच्यामुळे तुडुंब भरणार आहे. कोल्ड प्ले मध्ये डेमी लवाटो, बॉलिवूड गायक अरजित, शंकर महादेवन दमदार परफॉर्मस देणार आहेत. या कार्यक्रमाला शाहरूख खान, रणवीर सिंह, अमिर खान, ऑलंपिंक पदक विजेता विजेंद्र सिंह आणि साक्षी मलिकही सहभागी होणार आहेत.

संबंधित विषय
ताज्या बातम्या