Advertisement

मुंबईकरांसोबत 'जिमकी कमल'वर थिरकली मलिष्का...


मुंबईकरांसोबत 'जिमकी कमल'वर थिरकली मलिष्का...
SHARES

अभिनेता धनुषने गायलेलं 'कोलावरी डी' हे गाणं तुमच्या लक्षात आहे का? नक्कीच लक्षात असणार. 26 नोव्हेंबर 2011 साली आलेल्या या गाण्यानं आपल्या तालावर सर्वांनाच नाचवलं. हे गाणं एवढं हिट झालं की, त्या गाण्यावर अनेकांनी डबस्मॅश केलं होते. पण 2017 मध्ये आलेल्या मल्याळम साँगने तर 'कोलावरी डी' या गाण्याला मागे टाकलं आहे. 'जिमकी कमल' असे या गाण्याचे बोल असून सध्या हे गाणं तुफान चालत आहे. हे गाणं अनेकांनी आपल्या पद्धतीनं सादर केलं आहे. प्रसिद्ध रेडिओ जाॅकी मलिष्का सुद्धा या गाण्यावर थिरकली आहे. मलिष्का आणि तिच्या गँगने या गाण्याला महाराष्ट्रीयन तडका दिला आहे.



जिमकी कमलचा मराठी अंदाज पाहिल्यावर बघा 106.4 एफएम रेट्रोचा धारावी स्टाइल जिमकी कमल. धारावीत दिवसरात्र काम करणाऱ्या आणि राहणाऱ्यांचा प्रवास या गाण्यातून मांडण्यात आला आहे.



ओनमनिमित्त मुंबईतल्या एका ऑफिस ग्रुपने देखील हे गाणं आपल्या स्टाइलनं सादर केलं आहे.



केवळ ऑफिस ग्रुप नाही, तर डांस ग्रुप्सदेखील या गाण्याची मजा लुटत आहेत. 



फक्त मुंबईतच नाही, तर सातासमुद्रापार हे गाणं धुमाकूळ घालत आहे. 



सध्या सर्वांच्या ओठांवर असलेल्या या गाण्याचं ओरिजनल व्हर्जन तरी एेका? तुम्ही सुद्धा या गाण्याच्या प्रेमात पडाल. गाणं मल्याळम भाषेत असल्यानं कळणार नाही. पण तुमचे पाय या गाण्यावर आरोआप थिकरायला लागतील.



जिमकी कमल हे गाणं वेलीपडीनेट पुष्ठकम या मल्याळम चित्रपटातील आहे. रेंजीत उनी यानं हे गाणं गायलं आहे.

संगीत समजून घ्यायला भाषेची गरज नाही, हे या गाण्यावरून पुन्हा एकदा सिद्ध झालं. संगीतात जादूच अशी आहे की, हृदयाला संगीताचा प्रत्येक राग समजतो.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा