Advertisement

सुव्रत बनला ‘प्राजक्ताचा गुलाम’!

आता ‘डोक्याला शॉट’ या आगामी मराठीत ‘जोरू का गुलाम…’ हे मराठी-हिंदी मिश्रित गाणं प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याने पुन्हा एकदा जुन्या हिंदी सिनेमांची आठवण होते.

सुव्रत बनला ‘प्राजक्ताचा गुलाम’!
SHARES

हिंदी सिनेमांच्या इतिहासात ‘जोरू का गुलाम’ असलेले दोन सिनेमे प्रदर्शित झाले आहेत. यापैकी एक राजेश खन्ना, तर दुसरा गोविंदा अभिनीत... आता ‘डोक्याला शॉट’ या आगामी मराठीत ‘जोरू का गुलाम…’ हे मराठी-हिंदी मिश्रित गाणं प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याने पुन्हा एकदा जुन्या हिंदी सिनेमांची आठवण होते. या गाण्यात सुव्रत जोशी हा प्राजक्ता माळीचा गुलाम बनला आहे.


लग्न ठरल्यानंतरचे तोटे

शिवकुमार पार्थसारथी दिग्दर्शित 'डोक्याला शॉट' या चित्रपटाचा ट्रेलरनंतर या चित्रपटातील 'जोरू का गुलाम…' हे धमाकेदार गाणं प्रदर्शित झालं आहे. हे एक पार्टी साँग आहे. सुव्रत, प्राजक्ता यांच्यासोबत गणेश पंडित, रोहित हळदीकर, ओंकार गोवर्धन हे कलाकारही या गाण्यात आहेत. लग्न ठरल्यानंतर त्याचे तोटे काय आहेत हे सुव्रतला त्याचे मित्र सांगत आहेत. ‘तू नहीं तेरी मर्जी का मालिक, तू गुलाम तेरी जोरू का…’ असं म्हणत ते सुव्रतला चिडवत आहेत.


दाक्षिणात्य व मराठी संगीताचा अप्रतिम मेळ

गाण्यातील या शब्दांवरून सुव्रत आणि प्राजक्ता यांचं लग्न ठरलेलं असावं असा अंदाज बांधणं चुकीचं ठरणार नाही. याच कारणामुळे सुव्रतला त्याचे मित्र काहीशा वेगळ्या पद्धतीने चिडवताना दिसत आहे. गाण्याच्या सुरुवातीलाच दाक्षिणात्य संगीत ऐकू येतं.  पुढेही या गाण्यात दक्षिण भारतीय आणि महाराष्ट्रीय संगीताचा अप्रतिम मेळ जाणवतो.




शूट आणि दोन ब्लँकेट

या गाण्यात एक गंमत आहे. याचं संपूर्ण शूटिंग रात्री करण्यात आलं. शूट चालू असताना खूप थंडी असायची. या थंडीत गणेश पंडित हे नाचताना स्विमिंग पूलमध्ये पडतात, असं एक दृश्य आहे. त्यानंतर गाण्याचं शूटिंग संपेपर्यंत त्यांना ओलंच राहावं लागे. शूट संपलं की लगेच ते दोन ब्लॅंकेट घेऊन बसायचे. जोपर्यंत गाणं पूर्ण चित्रित होत नाही तो पर्यंत त्यांना ओलं राहावं लागलं होतं. तरीही त्यांनी हे शूटिंग पूर्ण करत फुल धमाल केली.


निर्मात्यांनीही ठरला ठेका

चित्रपटाचे निर्माता उत्तुंग ठाकूर यांनीही या गाण्याच्या तालावर ठेका धरला आहे. गाण्याच्या शूटिंगच्या वेळी सेटवरच चित्रपटाचे दिग्दर्शक शिवकुमार यांनी उत्तुंग ठाकूर यांना या गाण्यात डान्स करण्याची विनंती केली. ऐनवेळी केलेली ही विनंती उत्तुंग यांनी तितक्याच आनंदानं मान्य करत अवघ्या २० मिनिटांत डान्स स्टेप शिकून सर्व कलाकारांसोबत ताल धरला.


गाण्याला कैलाश खेर यांच्या आवाजाची जोड

गीतकार गुरु ठाकूरने अतिशय मार्मिक शब्दांमध्ये मराठी आणि दक्षिण भारतीय संस्कृतीचा मिलाफ घडवला आहे. श्रीकांत आणि अनिता या नवोदित संगीतकार जोडीनं या गाण्याला संगीत दिलं आहे. याला कैलाश खेर यांच्या दमदार आवाजाची जोड मिळाल्याने गाणं एका वेगळ्याच उंचीवर पोहोचलं आहे. फुलवा खामकर यांनी या गाण्याचं नृत्यदिग्दर्शन केलं आहे. दिग्दर्शक शिवकुमार यांचा हा पहिलाच सिनेमा आहे. यापूर्वी त्यांनी बऱ्याच दिग्दर्शकांसोबत सहाय्यक म्हणून काम केलं आहे.



हेही वाचा -

‘लोकल-व्हाया-दादर’च्या प्रेमात वरुण!

ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांना स्वाईन फ्लू



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा