‘लोकल-व्हाया-दादर’च्या प्रेमात वरुण!

‘लोकल-व्हाया-दादर’ या आगामी मराठी सिनेमाच्या प्रेमात असलेल्या वरुण धवनने आपल्या ट्विटर अकाऊंटवर या सिनेमाचं पोस्टर शेअर केलं आहे.

SHARE

मागील काही वर्षांपासून बॉलिवूडमध्ये मराठी सिनेमांच्या चाहत्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळेच कदाचित हिंदी सिनेसृष्टीतील आघाडीचे कलाकार-तंत्रज्ञही मराठी सिनेमाच्या प्रेमात आहेत. अभिनेता वरुण धवनही यात मागे नाही. ‘लोकल-व्हाया-दादर’ या आगामी मराठी सिनेमाच्या प्रेमात असलेल्या वरुणने आपल्या ट्विटर अकाऊंटवर या सिनेमाचं पोस्टर शेअर केलं आहे.


सोशल मीडियावर टीझर पोस्टर

सध्या बऱ्याच मराठी सिनेमांच्या सोहळ्यांना हिंदीतील कलाकार हजेरी लावत आहेत. काही जण तर छोटीशी भूमिका साकारत मराठीत काम करण्याची हौसही भागवत आहेत. तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेल्या वरुणला ‘लोकल-व्हाया-दादर’ या सिनेमाचं पोस्टर इतकं भावलं की, त्याने ते आपल्या ट्विटरवर शेअर केलं. ‘लोकल-व्हाया-दादर’ या चित्रपटाचं टीझर पोस्टर नुकतंच सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं. हेच टीझर पोस्टर शेअर करत वरुणने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून या चित्रपटाचे दिग्दर्शक नितीन रोकडे आणि संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या.‘लोकल-व्हाया-दादर'ची प्रेमकथा

करूणावी क्रिएटरची निर्मिती असलेल्या ‘लोकल-व्हाया-दादर’ या चित्रपटामध्ये एक निरागस प्रेमकथा पाहायला मिळणार आहे. यापूर्वी ‘तालिम’ या मराठी सिनेमाचं दिग्दर्शन करणाऱ्या रोकडे यांचा ‘लोकल-व्हाया-दादर’ हा आगामी सिनेमा आहे. या चित्रपटाची कथा-पटकथा रोकडे यांनीच लिहिली आहे. रोकडे यांनी यापूर्वी हिंदी आणि मराठी चित्रपटांचं संकलन केलं आहे. ‘तालिम’च्या माध्यमातून कुस्तीसारखा लोकप्रिय मैदानी खेळ रूपेरी पडद्यावर यशस्वीपणे मांडणारे रोकडे ‘लोकल-व्हाया-दादर’मधून एक प्रेमकथा घेऊन येत आहेत.


मराठीवर वरूणचं प्रेम

या चित्रपटाचे संवाद सायली केदार यांनी लिहिले असून, फारूख खान या सिनेमाचे डीओपी आहेत. अतिक अलाहाबादी यांनी या चित्रपटासाठी गीतलेखन केलं असून, संगीत विक्रम मॉन्ट्रोज देणार आहेत. रोकडे यांचे हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या कलाकार-तंत्रज्ञांशी खूप जवळचे संबंध आहेत. या मैत्रीपूर्ण संबंधांमुळेच वरुणने ‘लोकल-व्हाया-दादर’ या सिनेमाचं पोस्टर ट्विटरवर शेअर केलं आहे. मराठी सिनेमांवरील वरुणचं हे प्रेम पाहिल्यावर तो मराठी सिनेमात कधी दिसणार याबाबत उत्सुकता वाढली आहे.हेही वाचा -

EXCLUSIVE : अण्णांची 'शेवंता' हा तरी कोण?

अजब गणित! आठवडा एक, सिनेमे ५२?संबंधित विषय
ताज्या बातम्या