Advertisement

आर यु रेडी फॉर 'सुला फेस्ट'?

सुला फेस्टमध्ये सुलाच्या जगप्रसिद्ध वाईनच्या जोडीला जगभरात नावाजलेल्या ब्रँड्सच्या ३० हून अधिक वाईन्सचा समावेश असणार आहे. वाईनसोबतच संगीताचा आनंद देखील तुम्हाला इथं अनुभवता येणार आहे. यावर्षी वेगवेगळ्या अशा ३० देशांतील शंभरहून अधिक कलावंत आपली कला सादर करण्यास उत्सुक आहेत.

आर यु रेडी फॉर 'सुला फेस्ट'?
SHARES

जगभरात नाशिकची आगळीवेगळी ओळख बनलेला 'सुला फेस्ट' यावर्षी देखील उत्साहात साजरा होणार आहे. अकरावा 'सुला फेस्ट' ३ आणि ४ फेब्रुवारीला नाशिकमध्ये रंगणार आहे. सुला विनियार्डतर्फे गेली दहा वर्ष या दिमाखदार संगीत आणि त्यासोबत वाईन महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं. यासोबतच मुंबई तसेच अनेक शहरांमधून संगीतप्रेमी या फेस्टिव्हलला हजेरी लावतात.



संगीत आणि सोबतीला वाईन...

सुला फेस्टमध्ये सुलाच्या जगप्रसिद्ध वाईनच्या जोडीला जगभरात नावाजलेल्या ब्रँड्सच्या ३० हून अधिक वाईन्सचा समावेश असणार आहे. वाईनसोबतच संगीताचा आनंद देखील तुम्हाला इथं अनुभवता येणार आहे. यावर्षी वेगवेगळ्या अशा ३० देशांतील शंभरहून अधिक कलावंत आपली कला सादर करण्यास उत्सुक आहेत. 'पारोव्ह स्टेलरआका'ब्रिटिश बँड 'द बीट फिट', 'रँकिंग रोजर गिप्सी हिल' यांच्यासोबतच बॉशलँग अशा नामांकित बँड्सचं सादरीकरण इथं पाहायला मिळणार आहे.



फेस्टिव्हलची खासियत

नामांकित इंग्लिश इलेक्ट्रॉनिक फोक बँड क्रिस्टल फायटर त्यांच्या अनोख्या संगीत शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. जगभरातील नावाजलेल्या संगीत महोत्सवात या बँडनं आपल्या कलेचं सादरीकरण केलं आहे. आता हा बँड सुलाच्या व्यासपीठावर येणार आहे. याशिवाय 'पारोव्हा स्टेअरआका' याची 'इलेक्ट्रो स्वीग' ही शैली पाहण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. ऑस्ट्रेलियाचा 'बॉशलँग' हा बँड 'बिटबॉक्स' कौशल्यासाठी जगभर ओळखला जातो. गिटार, स्क्रॅच डिजे आणि इतर इलेट्रॉनिक बिट्स यामुळे 'गॅस्पी हिल बँड' अमेरिकेत प्रसिद्ध आहे. अशा या प्रसिद्ध बँडची कला या फेस्टिव्हलमध्ये पाहता येणार आहे.


फेस्टिव्हलचा आनंद लुटायचा आहे?

सुला फेस्टिव्हलचा आनंद लुटायचा असेल, तर लवकरात लवकर या लिंकवर https://in.bookmyshow.com/festival/sula-wines-music-fest/ तिकिट बुक करा!



हेही वाचा

मराठमोळ्या सणांची 'आस्वादि'क मेजवानी

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा