Advertisement

'म्युझियम कट्टा'मध्ये रंगली संगीतावर चर्चा


'म्युझियम कट्टा'मध्ये रंगली संगीतावर चर्चा
SHARES

भारतातील पारंपरिक आणि काळानुरूप बदलत गेलेल्या संगीत क्षेत्राबद्दलची चर्चा करण्यासाठी 'संगीत - एक संस्कृती बेशुद्ध' हा विशेष कार्यक्रम भायखळ्यातील डॉ. भाऊ दाजी लाड वस्तूसंग्रहालयाच्या वतीने रविवारी आयोजित करण्यात आला. 'म्युझियम कट्टा' या कार्यक्रमात झालेल्या संगीत चर्चेत व्हायरेनॉन इब्राहिम हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. व्हायरेनॉन हे संगीतकार असून ते फॅनागिगचे संस्थापक, संचालक आणि खरे संगीत विद्यालयाचे विभाग प्रमुख आहेत. ते एक उद्योजक देखील आहेत.

या कार्यक्रमात बॉलिवूडमध्ये 80-90 च्या दशकात पश्चात्य संगीताची सुरुवात आणि त्यानंतर बदलत गेलेले संगीत संस्कृती यावर व्हायरेनॉन यांनी व्याख्यान केले. या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात संगीतक्षेत्राशी निगडीत तरुण-तरुणींनी सहभाग घेतला. भाऊ दाजी लाड वस्तू संग्रहालयाच्या वतीने 'म्युझियम कट्टा' च्या माध्यमातून वस्तूसंग्रहालयात येणाऱ्या पर्यटकांना नवनवीन माहिती मिळावी यासाठी विविध कार्यक्रम राबवत आहे. ज्याला पर्यटकांचाही चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा