Advertisement

राज ठाकरेंच्या भाषणातील 9 महत्त्वाचे मुद्दे

मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं आहे.

राज ठाकरेंच्या भाषणातील 9 महत्त्वाचे मुद्दे
SHARES

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा भव्य विजयी मेळावा शनिवारी मुंबईतील वरळी डोममध्ये पार पडला. या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं आहे.

  • सरकारला फक्त मोर्चाच्या चर्चेनं माघार घ्यावी लागली. आजच्या मेळाव्यात किंवा यापुढं देखील मराठीच्या मुद्यावर  कुठचाही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा असेल.
  • कोणत्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, जवळपास 20 वर्षानंतर मी आणि उद्धव व्यासपीठावर एकत्र येत आहोत. 
  • कुठचाही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा, माझ्या मराठीकडे, माझ्या महाराष्ट्राकडे वेड्या वाकड्या नजरेनं कुणी पाहायचं नाही.
  • काही गरज नव्हती, कुठून हिंदीचं अचानक आलं कळलं नाही, हिंदी कशासाठी, कोणासाठी हिंदी,लहान लहान मुलांवर जबरदस्ती करताय, कोणाला विचारयचं नाही, शिक्षणतज्ज्ञांना विचारायचं नाही, आमची सत्ता आहे, बहुमत आहे, आम्ही लादणार हे चालणार नाही. 
  • तुमच्या हातात सत्ता असेल ती विधानभवनात, आमच्या कडे सत्ता आहे रस्त्यावर
  • कुठून त्रिभाषा सूत्र आणलं, त्रिभाषा सूत्र आलं ते फक्त केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यातील दुव्यासाठी त्रिभाषा सूत्र आणलं गेलं. कोर्टात, हाय कोर्टात, सुप्रीम कोर्टात इंग्रजीचा वापर होतो
  • महाराष्ट्र जेव्हा पेटून उठतो तेव्हा काय घडतं, हे राज्यकर्त्यांना समजलं असेल , त्याशिवाय का माघार घेतली. 
  • हिंदी भाषिक राज्य आर्थिकदृष्ट्या मागास, हिंदी न बोलणारी राज्य आर्थिकदृष्ट्या प्रगत, हिंदी बोलत नसलेल्या राज्यात नोकरीसाठी हिंदी भाषा बोलणारे लोक येत आहेत. 
  • गुजरात, मध्यप्रदेश,  पंजाबवर मराठी साम्राज्य पोहोचलेलं आम्ही मराठी लादली?



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा