लाचखोर नगरसेविकेला अटक

 Mumbai
लाचखोर नगरसेविकेला अटक

शिवडी - हाॅटेल मालकाविरोधात तक्रार असल्याचे सागंत त्यांच्याकडून 15 हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी एसीबीने एका नगरसेविकेसह तिच्या पीएला अटक केल्याने एकच खळबळ उडाली आहे. हेमांगी चेंबुरकर (55) असे या नगरसेविकेचे नाव आहे.

वाॅर्ड क्रमांक 199 च्या नगरसेविका हेमांगी चेंबुरकर यांनी येथील एका हाॅटेल मालकाला बोलावून घेतले. यावेळी त्यांनी या हाॅटेल मालकाला 'तुझ्या विरोधात भरपूर तक्रारी असल्याचे सांगितले, तसेच हे प्रकरण मिटवायचे असेल तर 25 हजार रुपये दे' अशी मागणी केली. मात्र त्याने 15 हजार रुपये देण्याचे कबूल केले. दरम्यान या हाॅटेल मालकाने याप्रकरणी एसीबीकडे तक्रार केली. एसीबीने या बातमीची खातरजमा करीत, तात्काळ सापळा लावला आणि हाॅटेलमालकाकडून 15 हजारांची लाच घेताना नगरसेविका आणि तिच्या पीएला अटक केली.

Loading Comments