पाकिस्तानात 'दंगल' टाळणाऱ्या आमिरचं विधानपरिषदेत कौतुक

 Vidhan Bhavan
पाकिस्तानात 'दंगल' टाळणाऱ्या आमिरचं विधानपरिषदेत कौतुक
Vidhan Bhavan, Mumbai  -  

आमिर खानच्या 'दंगल'ला पाकिस्तानमध्ये प्रदर्शित करण्याची परवानगी मिळाली. परंतु, भारताचे राष्ट्रगीत आणि राष्ट्रध्वजाच्या दृश्यांना कात्री लावण्यात आली. या चित्रपटाबाबत पाकिस्तान सेन्सॉर बोर्डाला कुठलाही आक्षेप नव्हता. परंतु भारताचे राष्ट्रगीत आणि राष्ट्रध्वज दाखवता येणार नाही असे त्यांनी सांगितले. यानंतर भारताच्या राष्ट्रगीताशिवाय हा चित्रपट प्रदर्शित होणार नाही असे आमिरने ठणकावून सांगितले. अमिरने घेतलेल्या भूमिकेमुळे त्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. आता महाराष्ट्राच्या विधान परिषदेनेही आमीर खानचं अभिनंदन केले आहे.

विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आमीर खानच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमीर खानचं अभिनंदन केलं आणि ‘दंगल’ सिनेमा टॅक्स फ्री करण्याची घोषणा केली.

भारतात गेल्या डिसेंबरमध्ये रिलीज झालेला आमीर खानचा ‘दंगल’ सिनेमा पाकिस्तानात आता रिलीज होण्याच्या शक्यता मावळल्या आहेत. कारण पाकिस्तानमध्ये रिलीज करण्याआधी पाकच्या सेन्सॉर बोर्डाने सिनेमातील दोन सीन कापण्यास सांगितले होते. मात्र, भारतीय तिरंगा आणि राष्ट्रगीताशी संबंधित हे दोन सीन होते. मात्र, आमीर खानने ठोस भूमिका घेत, दोन्ही सीन कापण्यास विरोध केला.

Loading Comments