Advertisement

आदित्य ठाकरे घेणार मंत्रिपदाची शपथ

शिवसेनेचे युवा नेते आणि नवनिर्वाचित आमदार आदित्य ठाकरे हे आज होत असलेल्या मंत्रीमंडळ विस्तारात शपथ घेणार आहेत.

आदित्य ठाकरे घेणार मंत्रिपदाची शपथ
SHARES

 शिवसेनेचे युवा नेते आणि नवनिर्वाचित आमदार आदित्य ठाकरे हे आज होत असलेल्या मंत्रीमंडळ विस्तारात शपथ घेणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांकडं पाठवलेल्या मंत्र्यांच्या यादीत आदित्य ठाकरे यांचं नाव आहे. आदित्य यांना कॅबिनेट मंत्रीपद दिलं जाणार आहे. त्यांच्याकडं कोणतं खातं सोपवलं जातंय याची उत्सुकता आता लागली आहे. 

महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होऊन ३४ दिवस झाले आहेत. सोमवारी मंत्रीमंडळ विस्तार होत आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे एकूण ३६ मंत्री शपथ घेणार आहेत. ) शपथविधी झाल्यानंतर खातेवाटप होईल असं बोललं जात आहे. शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नव्या मंत्र्यांना शपथ देणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. तर आदित्य यांना पर्यटन किंवा उच्च शिक्षणमंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  शिवसेनेकडून माजी मंत्री तानाजी सावंत यांचा पत्ता कट करण्यात आल्याचे समजते. सावंत यांच्या जागी शिवसेनेत नुकतेच दाखल झालेले अब्दुल सत्तार यांना संधी देण्यात येत आहे. याबरोबरच शंकरराव गडाख, बच्चू कडू आणि राजेंद्र पाटील या तीन आमदारांना शिवसेनेच्या कोट्यातून मंत्रिपदे मिळतील. गडाख यांना कॅबिनेट तर बच्चू कडू आणि राजेंद्र पाटील यांना राज्यमंत्रिपद मिळणार आहे. 



हेही वाचा -

वाईट नेता मिळणे ही महाराष्ट्राची चूक नाही- अमृता फडणवीस




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा