Advertisement

पंकजा, धनंजय पुन्हा आमने-सामने!


पंकजा, धनंजय पुन्हा आमने-सामने!
SHARES

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना अडचणीत आणणारी एक तथाकथित ऑडिओ क्लिप एका वृत्तवाहिनीने काल दाखवली. त्यांनतर आता रोज एका मंत्र्यांची क्लिप किंवा सीडी सदनाला सादर करण्याचा चंगच धनंजय मुंडेंनी बांधला. याची प्रतिकात्मक सुरुवात म्हणून ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक प्रदीप कुलकर्णी यांच्या नावाने सोशल मीडियात भ्रष्टाचाराची एक ऑडियो क्लिप सादर केली. त्यामुळे पंकजा मुंडे-धनंजय मुंडे हे दोघे भाऊ-बहीण पुन्हा एकमेकांसमोर ठाकले आहेत.


कथित भ्रष्टाचाराचा अारोप

सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी सकाळी विधानसभेचे कामकाज सुरू होताच विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर कथित भ्रष्टाचाराचा आरोप केला. त्याचे खंडन करत आपल्याविरुद्ध सरकारने सुरू केलेल्या राजकारणाचा शेवट विरोधी पक्ष करेल, असा इशारा धनंजय मुंडेंनी दिला.


स्वीय सहाय्यकांनी दाखल केला गुन्हा

यासंदर्भात स्पष्टीकरण देताना ऑडियो क्लिपप्रकरणी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक प्रदीप कुलकर्णी यांनी अनोळखी मोबाईलधारकाविरुद्ध परळी वैजनाथ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती पंकजा मुंडेंनी दिली. विरोधी पक्षनेत्यांनी याची पूर्ण माहिती पुरवावी. त्यावर आपण मुख्यमंत्र्यांना येत्या ७ दिवसांत निर्णय घेण्यास सांगू, असे आवाहनही त्यांनी धनंजय मुंडेंना केले.


विशेषाधिकार हक्कभंग प्रस्ताव 

बुधवारी एका वृत्तवाहिनीवर माझ्या बाबतीत बातमी दाखवण्यात अाली. विधिमंडळात दलाली सुरू आहे, असा आरोप करण्यात आला. ही गोष्ट विधिमंडळाची बदनामी करणारी आहे. सभागृहाने या विरोधात आवाज उठवणं गरजेचं होतं. मात्र तसं झालं नाही. अशा खालच्या पातळीचं राजकारण सध्या राज्यात सुरू आहे. याची सुरुवात कोणीही केली, असेल पण त्याचा अंत मात्र विरोधी पक्ष करणार, असा इशारा विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी दिला. या वाहिनीवर हेमंत टकले यांनी हक्कभंग प्रस्ताव दाखल केला.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा