पुढील स्टेशन 'राम मंदिर'


  • पुढील स्टेशन 'राम मंदिर'
  • पुढील स्टेशन 'राम मंदिर'
  • पुढील स्टेशन 'राम मंदिर'
SHARE

मुंबई - पश्चिम रेल्वेच्या जोगेश्वरी आणि गोरेगाव दरम्यान बांधलेल्या नव्या रेल्वे स्टेशनला राम मंदिर स्टेशन असं नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. काही दिवसांपासून स्थानिक आमदार आणि राज्यमंत्री विद्या ठाकूर यांनी राम मंदिर नाव देण्याची मागणी केली होती. याअगोदरपासून चर्चगेट, मस्जिद बंदर, गुरू तेग बहादुरनगर या सर्व स्टेशनचं नाव धर्माशी संबधित आहे. मात्र राज्य सरकारच्या या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसनं विरोध केलाय. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जिंकण्यासाठी पुन्हा एकदा राम मंदिराचं भांडवल केलं जात आहे. त्यामुळे जनतेने सावध राहावं असं नवाब मलिक यांनी ट्वीट करून विरोध केला.

या अगोदर जोगेश्वरी आणि गोरेगाव दरम्यान बांधलेल्या नव्या रेल्वे स्टेशन बनवण्याचं श्रेय घेण्यामध्ये भाजपा आणि शिवसेनेमध्ये चढाओढ लागली होती. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी या स्टेशनची पाहणी केली होती त्यानंतर भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनीही या स्टेशनला भेट देऊन पाहणी केली होती.

संबंधित विषय
ताज्या बातम्या