महापालिका नामनिर्देशीत सदस्यांची नावे जाहीर

 Mumbai
महापालिका नामनिर्देशीत सदस्यांची नावे जाहीर
महापालिका नामनिर्देशीत सदस्यांची नावे जाहीर
See all

मुंबई - मुंबई महापालिकेत नामनिर्देशीत सदस्य म्हणून भाजपाच्या वतीने गणेश खणकर आणि श्रीनिवास त्रिपाठी या दोघांची नावे निश्चित झाली आहेत. मुंबई भाजपा अध्यक्ष आशीष शेलार यांनी ही माहिती आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन दिलीय. 


त्यांनी त्यांच्या ट्विटरमध्ये गणेश खणकर आणि श्रीनिवास त्रिपाठी यांची आज मुंबई मनपा नामनिर्देशीत नगरसेवक म्हणून नियुक्ती केली, असं लिहिलंय. तसंच त्या दोघांना आपल्या ट्विटरद्वारे शुभेच्छा देखील दिल्या आहेत. शिवसेनेच्या वतीने माजी सभागृहनेत्या तृष्णा विश्वासराव आणि अरविंद भोसले तर काँग्रेसच्या वतीने सुनील नरसाळे यांची नावे चर्चेत आहेत. 27 तारखेच्या सभागृहात यांच्या नावांची घोषणा होणार आहे.

Loading Comments