'भाजपा-शिवसेना जनतेची दिशाभूल करतायंत'

 Mumbai
'भाजपा-शिवसेना जनतेची दिशाभूल करतायंत'

मुंबई - मुंबईतील विविध भागांमध्ये प्रत्येक पक्षांच्या प्रमुखांनी आपल्या पक्षाचा प्रचार करण्यासाठी निवडणुकीच्या अंतिम टप्यात विविध भागांमध्ये जाहीर सभा आयोजित केल्या होत्या . मात्र राज्याचा वजीर असतानाही पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या सभेला कोणी नाही यावर निशाणा साधत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सायन अॅटाँपहिल येथील जाहीर सभेत टीका केली.

तर खिशात राजीनामा घेऊन फिरणाऱ्या शिवसेनेला भाजपासोबत राहायचं आहे. म्हणून राजीनामा खिशात घेऊन फिरतात पण राजीनामा देऊन सत्तेतून बाहेर पडत नाहीत. कारण आपण दोघे भाऊ भाऊ आणि जे मिळेल ते वाटून खाऊ अशी नियती ठेवून ते जनतेची दिशा भूल करत असल्याचा आरोपही अशोक चव्हाण यांनी यावेळी केला.

Loading Comments