अश्रफ थम्बासारी यांचा सत्कार

 Pali Hill
अश्रफ थम्बासारी यांचा सत्कार

मुंबई - परदेशात मृत पावणाऱ्या व्यक्तींचा मृतदेह स्वखर्चाने विमानाने त्यांच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचविणाऱ्या दुबईस्थित भारतीय रहिवासी अश्रफ थम्बासारी यांचा आज शिवसेनेने सत्कार केला. वाहतूक सेनेचे अध्यक्ष हाजी अराफत यांनी शिवसेनेतर्फे उध्दवगड येथे थम्बासारी यांचा जाहीर सत्कार केला. अश्रफ थम्बासारी हे सन २००० सालापासून ही अनोखी मोहीम राबवीत आहेत.

आजवर सुमारे ३८०० विविध देशातील मृतदेह त्यांनी विमानाद्वारे त्यांच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले आहे. विशेष बाब म्हणजे यापैकी सर्वाधिक मृतदेह हे भारतातील आणि त्यातही हिंदूधर्मीय व्यक्तींचे होते. कोणताही जात-पंथ-धर्म-देश न पाहता केवळ माणुसकीच्या नात्याने अश्रफ हे सर्व काही करतात. या कामातून मिळणारे पुण्य आणि आशीर्वाद माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत असे अश्रफ आवर्जून सांगतात.

Loading Comments