21 जानेवारीला मुंबईत बहुजन क्रांती मोर्चा

  Fort
  21 जानेवारीला मुंबईत बहुजन क्रांती मोर्चा
  मुंबई  -  

  सीएसटी - बहुजनांच्या न्याय हक्कासाठी मुंबईतील आझाद मैदानात 21 जानेवारीला बहुजन क्रांती मोर्चा काढण्यात येणार आहे. भायखळा ते आझाद मैदान असा हा मोर्चा पार पडणार आहे. जवळपास 5000 संघटनांचा या मोर्चाला पाठिंबा आहे. अॅट्रोसिटीचा कायदा रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात हा मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती बहुजन क्रांती संयोजन समितीचे सदस्य जीवन भालेराव यांनी सांगितले.

  बहुजन समाजाच्या मागण्या

  • अॅट्रॉसिटी कायदा अधिक कडक केला पाहिजे
  • आपल्या न्याय्य हक्कांसाठी बहुजन समाजाला लढायला तयार केले पाहिजे
  • अॅट्रॉसिटीचा गैरवापर करणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला पाहिजे
  • ओबीसींची जनगणना झाली पाहिजे
  • ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळालं पाहिजे
  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.