भारिप बहुजन लढणार स्व:बळावर


SHARE

नरिमन पॉईंट : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर भारिप बहुजन महासंघाने आढावा बैठक घेतली आहे. यावेळी दोन आकडी संख्याबळ महापालिकेच्या सत्तेत गेल पाहिजे असे प्रतिपादन भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय नेते अॅड.प्रकाश आणि बाळासाहेब आंबेडकर यांनी केले. नरिमन पॉईंट इथल्या भारिप बहुजनच्या केंद्रीय कायार्लयात कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. 2017मध्ये होणारी महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची भूमिका भारिप बहुजन संघाने घेतली आहे. त्या अनुषंगाने कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हानिहाय तसेच वॉर्डस्तरीय कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या धर्तीवर आपापल्या जबाबदाऱ्या नेमून देण्यात आल्या. यावेळी नगरसेवक अरुण कांबळे, मुंबई अध्यक्ष सुनील पवारही उपस्थित होते.

संबंधित विषय