Advertisement

तर जयंत पाटील भाजपात असते- नारायण राणे

महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं नसतं तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाजपात असते, असा दावा भाजपा खासदार नारायण राणे यांनी केला आहे.

तर जयंत पाटील भाजपात असते- नारायण राणे
SHARES

महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं नसतं तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाजपात असते, असा दावा भाजपा खासदार नारायण राणे यांनी केला आहे. रत्नागिरीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हा दावा केला. 

महाविकास आघाडीच्या पदवीधर मतदारसंघातील उमेदवाराच्या प्राचारात बोलताना जयंत पाटील (jayant patil) यांनी आघाडी सरकारवर सातत्याने टीका करणारे नारायण राणे यांच्यावर दोन दिवसांपूर्वीच खिल्ली उडवली होती. महाविकास आघाडी सरकार पडणार असं सांगत भाजप जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करत आहे. मात्र, महाविकास आघाडी सरकारने यशस्वीपणे एक वर्ष पूर्ण केलं आहे. त्यामुळे नारायण राणे यांच्या टीकेला गंभीर्याने घेण्याची गरज नाही. कारण गंजलेल्या तोफेतून आलेल्या गोळ्यांना उत्तर द्यायचं नसतं. 

या टीकेला उत्तर देताना राणे म्हणाले, जर महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं नसतं तर जयंत पाटील हे भाजपमध्ये असते. भाजपच्या (bjp) वरिष्ठ नेत्यांशी त्यांनी पक्ष प्रवेशावर गुपचूप बोलणीही केली होती. हे सगळं गुपीत मी जयंत पाटील यांचा मतदारसंघ असलेल्या इस्लामपुरात जाऊन उघड करणार आहे, असा इशारा देखील नारायण राणे यांनी दिला.

हेही वाचा- महाराष्ट्राला कर्तृत्ववान मुख्यमंत्री हवाय, ड्रायव्हर नको- नारायण राणे

काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन नारायण राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना हे सरकार महाराष्ट्रातील जनतेला फसवून सत्तेत आल्याचं म्हटलं होतं. हे अनैसर्गिक सरकार असल्याने ते कधीही कोसळू शकते. महाराष्ट्रासाठी हे सरकार पोषक नाही. हे सरकार गेल्यानंतर अन्य दोन पक्षांपैकी एका पक्षासोबत युती होऊ शकते किंवा राज्यात पुन्हा राष्ट्रपती राजवट लागू शकते, असा अंदाज देखील नारायण राणे यांनी व्यक्त केला.

तर कोणत्याही विषयाचं ज्ञान नसलेले मुख्यमंत्री राज्याला लाभल्याने महाराष्ट्र अधोगतीकडे चालला आहे. याला शिवसेनेसोबतच (shiv sena) अन्य दोन घटकपक्षही जबाबदार आहे. मुख्यमंत्र्यांनी वर्षभरात लोकहितासाठी, हिंदुत्वासाठी काय केलं? शेतकऱ्यांसाठी काय केलं? हा प्रश्न आहे. कोरोनाचे बळी आणि रुग्णांच्याबाबतीत महाराष्ट्र राज्य एक नंबर वर आहे. कामामध्ये शून्य आणि याबाबतीत एक नंबर, अशी परिस्थिती आहे. मागच्या ६ महिन्यांमध्ये ६५ हजार कोटी रुपयांचं कर्ज काढून या सरकारने राज्याला दिवाळखोरीत नेल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला. (bjp mp narayan rane criticized ncp leader jayant patil)


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा