Advertisement

narayan rane: शिवसेनेला शरद पवारांचा अचानक पुळका कसा आला?- नारायण राणे

सामनात प्रसिद्ध झालेली पवार यांची मुलाखत हे केवळ राजकारण असल्याचा दावा भाजप नेते खासदार नारायण राणे यांनी केला. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राणे यांनी हे वक्तव्य केलं.

narayan rane: शिवसेनेला शरद पवारांचा अचानक पुळका कसा आला?- नारायण राणे
SHARES

एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अत्यंत तिखट शब्दांत टीका करणाऱ्या शिवसेनेला शरद पवारांचा अचानक पुळका कसा आला? असा प्रश्न विचारत सामनात प्रसिद्ध झालेली पवार यांची मुलाखत हे केवळ राजकारण असल्याचा दावा भाजप नेते खासदार नारायण राणे यांनी केला. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राणे यांनी हे वक्तव्य केलं. (bjp mp narayan rane slams sharad pawar interview published in saamana)

सामनात मुलाखत

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना दैनिकाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी नुकतीच शरद पवार यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीतून शरद पवार यांनी महाविकास आघाडी सरकारची स्थापना ते विरोधी पक्ष असलेल्या भाजपचा अतिआत्मविश्वास अशा अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. त्यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना चांगलाच पेव फुटला होता. 

त्यावर प्रसारमाध्यमांशी बोलताना नारायण राणे म्हणाले, शरद पवार यांच्याबद्दल मला आदर असून हा आदर ठेवूनच मी बोलतोय. सामनातील बातम्या आणि अग्रलेखांमधून शरद पवार यांच्यावर नेहमीच टीका करण्यात आली. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे असोत किंवा उद्धव ठाकरे एवढंच नाही, तर संजय राऊत यांनीही पवारांवर वारंवार टीका केली आहे. मग अचानक शिवसेनेला पवारांचा पुळका कसा काय आला?

हेही वाचा - Narayan Rane: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मातोश्रीपुरताच- नारायण राणे

पवारांवर सर्वाधिक टीका

ज्या सामनात  'शरद पवार हे मॉडर्न अफझलखान', 'महाराष्ट्राचे खरे शत्रू शरद पवारच', 'शरद पवार कोण? चोरांचे सरदार गुंडाचे बादशहा', अशा मथळ्यासह बातम्या छापून आल्या, त्या सामनात चक्क त्यांची मुलाखत छापून येते? खरं तर सामनामध्ये पवार यांच्यावर जेवढी टीका झाली, तेवढी आजपर्यंत कुणावरही झाली नाही. त्यामुळेच ही मुलाखत केवळ केवळ राजकारण असून राज्यात सुरू असलेल्या कोरोनाच्या संकटावरून लक्ष वळवण्यासाठीच केलेला प्रकार असल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला.   

शिवसैनिक दखल घेणार

ही मुलाखत ऐतिहासिक असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं. त्याची इतर कुणी दखल घेवो अथवा न घेवा शिवसैनिक मात्र नक्कीच घेणार आहेत. आधीची शिवसेना आणि आताची शिवसेना यातला फरक यानिमित्ताने शिवसैनिकांना कळून चुकला आहे. या मुलाखतीत पवारांना एकप्रकारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कारभारावरही टीका केली आहे. सरकारमध्ये संवाद नसल्याचं शरद पवार एकप्रकारे मान्यच केलं आहे. त्यावरून संजय राऊत हे नोकरी सामनाची करतात आणि काम शरद पवार यांच्यासाठी करतात हे पुन्हा एकदा स्पष्ट झाला टोलाही नारायण राणे यांनी राऊतांना लगावला. 

हेही वाचा - Mahajobs: महाविकास आघाडी फक्त शिवसेना-राष्ट्रवादीची? काँग्रेसच्या ‘या’ नेत्याने विचारला प्रश्न


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा