Advertisement

मुलुंडला भाजपातर्फे भाजी मेळावा


मुलुंडला भाजपातर्फे भाजी मेळावा
SHARES

मुलुंड - थेट शेतातली ताजी भाजी शहरात उपलब्ध व्हावी या उद्देशानं भाजपातर्फे मुलुंडमधील जिवा महाला मैदानात गुरुवारी संध्याकाळी भाजी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात अनेक भाजी विक्रेत्यांनी भाग घेतल्यानं ग्राहकांना विविध भाज्यांचे पर्याय उपलब्ध झाले. कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट शेतातली भाजी या बाजारपेठेत उपलब्ध होत असून किमतीही रास्त आहेत. त्यामुळे या भाजी मेळाव्याला मुलुंडकरांनी चांगलीच गर्दी केली होती. दर गुरुवारी होणाऱ्या या मेळाव्याला असाच प्रतिसाद मिळतो का, हे पाहाणं उत्सुकतेचं ठरेल.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा