Advertisement

सर्वसामान्यांच्या लोकल प्रवासासाठी भाजप आणि काँग्रेस आमने-सामने

राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरली असून, राज्य सरकारनं काहीसे निर्बंध शिथिल केले आहेत.

सर्वसामान्यांच्या लोकल प्रवासासाठी भाजप आणि काँग्रेस आमने-सामने
SHARES

राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरली असून, राज्य सरकारनं काहीसे निर्बंध शिथिल केले आहेत. परंतू, सर्वसामान्यांना यातून दिलासा न मिळाल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. कारण, कोरोनाची लाट ओसरल्यानंतर मुंबई लोकल सुरू होईल अशी, अपेक्षा सर्वसामान्यांना होती. पंरतू, सरकारनं कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता सांगत अद्याप लोकल सेवेला परवानगी दिलेली नाही. त्यामुळं सर्वसामान्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अशातच आता सर्वसामान्य मुंबईकरांना लोकल प्रवास करण्यास परवानगी देण्याच्या मुद्द्यावरून आता भाजपा आणि काँग्रेस आमने-सामने आले आहेत.

महाराष्ट्र काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपावर टीका केली. भाजपाने मुंबईकरांना लोकलमधून प्रवेश देण्यासाठी सविनय नियमभंग आंदोलन करण्याच्या इशारा दिला होता. मात्र, आंदोलन न केल्यानं सावंत यांनी भाजपाला लक्ष्य केलं. सचिन सावंत यांनी टीका केल्यानंतर भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सावंत यांच्यासह काँग्रेस आणि महाविकास आघाडी सरकार पलटवार केला आहे.

केशव उपाध्ये यांनी ट्वीट करत सावंत यांना प्रत्युत्तर दिलं असून, यातून लोकांना छळण्यात तुम्हाला आनंद मिळत असल्याचंच दिसत आहे, अशा शब्दात उपाध्ये यांनी टीका केली. 'धन्यवाद. तुम्ही ट्वीट केल्यामुळे महाविकास आघाडी आणि काँग्रेसला सामान्य मुंबईकरांना छळण्यात कसा विकृत आनंद मिळतो हे दिसले. आम्ही योजना बदलली आणि पितळ उघडं पडलं. सामान्य मुंबईकरांच्या लोकल प्रवासावरून काल हायकोर्टाने थापडा मारल्या तरी तुमच्या सरकारला जाग आली नाही', असा उलट सवाल उपाध्ये यांनी केला आहे.

'लोकांचे प्रश्न सोडविण्यापेक्षा त्यांना छळायचे आणि आंदोलनं झाली की, मजा बघायची असा उरफाटा कारभार आहे. आंदोलन तर होईलच. सामान्य मुंबईकरांच्यासाठी. महापालिकेत विरोधी पक्ष म्हणून मिरवता, पण सामान्य मुंबईकराच्या प्रश्नावर स्पष्ट भूमिका घेण्याऐवजी कुचेष्टा करता हेही जनता पहाते आहे', असा इशाराही उपाध्ये यांनी काँग्रेसला दिला.



हेही वाचा -

राज्यात ६ हजार नवीन कोरोना रुग्णांचं निदान

Unlock Guideline In Mumbai : मुंबईत काय सुरू? काय बंद? वाचा सविस्तर


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा