Advertisement

जाहिरातबाजीत भाजपा अव्वल; काँग्रेस सहाव्या स्थानावर

गुगलवर जाहिरातबाजी करण्यावर भाजपाने अव्वल स्थान मिळवंल आहे. गुगलवर येणाऱ्या राजकीय जाहिरातींपैकी ३२ टक्के राजकीय जाहिराती भाजपाच्याच असल्याची माहिती समोर आली आहे.

जाहिरातबाजीत भाजपा अव्वल; काँग्रेस सहाव्या स्थानावर
SHARES

गुगलवर जाहिरातबाजी करण्यामध्ये भाजपाने अव्वल स्थान मिळवलं आहे. गुगलवर येणाऱ्या राजकीय जाहिरातींपैकी सर्वाधिक म्हणजेच ३२ टक्के खर्च भाजपानं केला असल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडं गुगलवर राजकीय जाहिरातींपोटी काँग्रेसनं केवळ ०.१४ टक्के खर्च केला असल्याचं समोर आलं आहे.


३.७६ कोटींचा खर्च

इंटरनेट क्षेत्रातील दिग्गज कंपनी इंडियन ट्रान्सपरन्सीच्या अहवालानुसार, १९ फेब्रुवारी २०१९ पासून राजकीय पक्षांनी जाहिरातींवर ३.७६ कोटींचा खर्च केला होता. त्यापैकी भाजपाने १.२१ कोटी रूपये जाहिरातींवर खर्च करून अव्वल स्थान प्राप्त केलं आहे. तर ५४ हजार १०० रूपये गुगलवरील जाहिरातीसाठी खर्च करून काँग्रेस सहाव्या स्थानावर राहिली आहे. तसंच जाहिरात धोरणाचं उल्लंघन केल्याचं सांगत ११ राजकीय जाहिरातदारांपैकी ४ जणांच्या जाहिरातींवर बंदी घातल्याचं गुगलकडून स्पष्ट करण्यात आलं.  


वायएसआर दुसऱ्या स्थानावर

अहवालानुसार, भाजपानंतर गुगलवर जाहिरातीसाठी सर्वाधिक खर्च करणाऱ्यांमध्ये आंध्र प्रदेशातील जगमोहन रेड्डी यांचा वायएसआर काँग्रेसचा क्रमांक येतो. त्यांनी आतापर्यंत जाहिरातीवर १.०४ कोटी रूपयांचा खर्च केला आहे. तर पम्पी साईचरण रेड्डी या जाहिरातदारानं वायएसआर काँग्रेसच्या एका उमेदवाराच्या जाहिरातीसाठी २६ हजार ४०० रूपये खर्च केले आहेत.

तेलुगु देसम पार्टी आणि चंद्राबाबू नायडू यांचा प्रचार करणाऱ्या प्रमण्या स्ट्रॅटजी कन्सल्टींग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं ८५.२५ लाख रूपयांचा खर्च केला आहे. तर डिजिटल कन्सल्टींग प्रायव्हेट लिमिटेडनं नायडू आणि त्यांच्या पक्षाच्या प्रचारासाठी ६३.४३ लाखांचा खर्च केला आहे.




हेही वाचा -

भाजपाविरोधात राज ठाकरे राज्यभरात घेणार ८ ते ९ सभा

प्रिया दत्त, पूनम महाजनांविरोधात तृतीयपंथी रिंगणात



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा