Advertisement

नगरसेवक पदाचा षटकार लगावणार का?


नगरसेवक पदाचा षटकार लगावणार का?
SHARES

मुंबई - मुंबई महापालिका निवडणुकीत तब्बल २२७१ उमेदवार रिंगणात उतरले असून, यामध्ये परळ-भोईवाडातील प्रभाग २०२मधील शिवसेनेच्या उमेदवार श्रद्धा जाधव आणि मालाडमधील भाजपाचे उमेदवार डॉ. राम बारोट हे सलग सहाव्यांदा नशीब आजमावत आहेत. त्यामुळे सलग सहाव्यांदा निवडणुकीत उतरणारे संपूर्ण मुंबईतील हे दोनच उमेदवार आहेत. त्यामुळे हे दोन्ही उमेदवार विजयाचा षटकार ठोकतात का याकडे सर्वांचे लक्ष आहे.

शिवसेनेच्या श्रद्धा जाधव आणि राम बारोट हे मार्च १९९२ च्या निवडणुकीत प्रथम नगरसेवक म्हणून निवडून आल होते. त्यानंतर सलग पाचवेळा दोन्ही उमेदवार नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. श्रद्धा जाधव यांनी पहिल्या महापौर परिषदेत काम केले होते. त्यानंतर नोव्हेंबर २००९ ते मार्च २०१२पर्यंत मुंबईचे महापौरपद भूषवले आहे. त्यानंतरही त्या २०१२च्या सार्वत्रिक निवडणुकीत त्या अँटॉप हिलमधून पुन्हा निवडून आल्या. आता मार्च २०१७ च्या महापालिका निवडणुकीत श्रद्धा जाधव या पुन्हा आपल्या जुन्या प्रभागात अर्थात प्रभाग २०२ मधून निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत.

भाजपाचे मालाडमधील राम बारोट हे सध्या प्रभाग ४५ मधून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. राम बारोट यांनी उपमहापौरपद तसेच सुधार समितीचे अध्यक्षपद भुषवले आहे. राम बारोट यांनी २०१४ ची विधानसभा निवडणूकही लढवली आहे. यामध्ये त्यांचा पराभव झाला आहे. तर श्रद्धा जाधव यांनीही परळ-भोईवाडयात सन २००६ मध्ये विधानसभेची पोटनिवडणूक लढवली होती.

महापालिकेत सलग ९ वेळा निवडणून येण्याचा मान वरळीतील मणिशंकर कवठे यांनी मिळवला होता. त्यानंतर जास्तवेळा निवडून येण्याचा मान या दोन्ही नगरसेवकांच्या नावावर आहे. त्यामुळे सलग सहाव्यांदा निवडणूक लढवणाऱ्या या दोन्ही ज्येष्ठ नगरसेवकांना जनता पुन्हा महापालिकेत पाठवतात का हेच पाहायचे आहे.

सलग पाचव्यांदा अन्सारी आणि गिरकर निवडणूक रिंगणात

महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक २२३ मधून एआयएमआयएम पक्षाच्या उमेदवार वकारुनिस्सा अंसारी आणि भाजपाच्या उमेदवार शैलजा गिरकर हे सलग पाचव्यांदा निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. वकारुनिस्सा अंसारी या प्रथम समाजवादी पक्षाच्या नगरसेविका होत्या. त्यानंतर २००५ मध्ये सपाचे बहुतांशी नगरसेवक यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश् केला. तेव्हापासून त्या काँग्रेसच्या नगरसेविका आहेत. परंतु या मतदार संघातून माजी विरोधी पक्षनेते ज्ञानराज निकम यांच्या मुलीला उमेदवारी दिल्यामुळे वकारुनिस्सा अंसारी यांनी एआयएमआयएम पक्षात प्रवेश केला.

सलग चार वेळा निवडून आलेल्या शैलजा गिरकर यांनी उपमहापौरपद भूषवले असून, बारोट यांच्यानंतर पक्षातील सर्वात ज्येष्ठ नगरसेविका त्या आहेत.

चौथ्यांदा निवडणूक लढवणारे उमेदवार, नगरसेवक

शिवसेना : यशोधर फणसे, रमेश कोरगावकर, अनुराधा पेडणेकर, अश्विनी मते, भोमसिंह राठोड, अनघा म्हात्रे, तृष्णा विश्वासराव

भाजपा : मोहन मिठबावकर, उज्ज्वला मोडक

काँग्रेस : ज्योत्सना दिघे, शीतल म्हात्रे, डॉ. गीता यादव

तिसऱ्यांदा निवडणुकीत उभे असणारे नगरसेवक उमेदवार

शिवसेना : देवेंद्र आंबेरकर, कोमल जामसंडेकर, संध्या दोशी, राजन पाध्ये, राजू पेडणेकर, सुरेंद्र बागलकर, रमाकांत रहाटे,

भाजपा : मनोज कोटक, महेश पारकर, प्रविण शाह

काँग्रेस : आसिफ झकेरिया

राष्ट्रवादी काँग्रेस : राखी जाधव, नंदू वैती

अभासे : गीता गवळी, वंदना गवळी

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा