Advertisement

BMC Election 2022: मुंबई महापालिका वार्ड पुर्नरचनेचा आराखडा आयोगाला सादर

येत्या काही दिवसांत राज्यात महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे.

BMC Election 2022: मुंबई महापालिका वार्ड पुर्नरचनेचा आराखडा आयोगाला सादर
SHARES

येत्या काही दिवसांत राज्यात महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. राज्यातील मुंबई वगळता इतर महापालिका निवडणुकीत प्रभाग रचनेने निवडणुका होणार आहेत. मुंबईत वार्ड संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळं नवीन वार्ड रचनेचा आराखडा राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

मुंबईत आता २२७ वार्ड ऐवजी २३६ पर्यंत वार्ड वाढवण्यात आले आहेत. त्यामुळं वार्ड रचना बदलण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनं वार्ड पुर्नरचनेचा आराखडा शुक्रवारी निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आला आहे. २०११ च्या लोकसंख्येच्या आधारे नव्या इमारती, वस्त्या, वाढीव बांधकामे झालेल्या परिसराचा विचार करता पुर्नरचनेचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई शहर, उपनगर आणि पूर्व उपनगरात प्रत्येकी ३ वार्ड वाढवल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मुंबईतील वरळी, लोअर परेळ, पूर्व उपनगरात मानखुर्द, संघर्षनगर, माहूल तर पश्चिम उपनगरात बोरिवली, मालाड, वांद्रे या भागात वार्ड वाढवले जाऊ शकतात.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा